बेधडक के.के !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:52 IST
एखादा सिनेमा निवडताना माझ्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा, याच विचाराने तो मी स्वीकारतो.त्यामागे कोणते अमुक एक कारण नसते. हे ...
बेधडक के.के !
एखादा सिनेमा निवडताना माझ्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा, याच विचाराने तो मी स्वीकारतो.त्यामागे कोणते अमुक एक कारण नसते. हे मत आहे प्रसिद्ध अभिनेता के. के. मेननचे. सात उचक्के या सिनेमात के.के. मेनन पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने त्याच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद.'सात उचक्के' या सिनेमाच्या कथेविषयी आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?अस्सल सिनेमाच्या इतिहासातील सगळ्यात अस्सल आणि वास्तववादी हा सिनेमा आहे, असे मी म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सिनेमाचा ट्रेलर पाहून सिनेमा कॉमेडी असल्याचे तुम्हाला कळलेच असेल. मात्र, विनोदी अंगाने या सिनेमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात मी मनोज नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली आहे. एक तरुणी मनोजवर प्रेम करते; मात्र काही काळानंतर ती त्याला फसवून निघून जाते. त्यानंतर काय घडते, हे या सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तुझ्यात आणि मनोज वाजपेयीमध्ये खटके उडल्याची चर्चा आहे. त्यात किती सत्यता आहे? या सिनेमातील अनेक कलाकार रंगभूमीशी जोडलेला आहे. प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या ठिकाणाहून अभिनयाचे धडे घेऊन येतो आणि एकत्र काम करतो. काम करता-करता प्रत्येक कलाकार एकमेकांपासून काही ना काही शिकत असतो. खरे तर प्रत्येकाला सगळ्यात जास्त आपले काम आवडते. असे असले, तरी एकमेकांच्या कामाचे कौतुक करणे आम्हाला कधीही कठीण गेले नाही. आमच्या भांडणाविषयी ज्या चर्चा होत आहेत, त्याकडे मी फार गांभीर्याने पाहत नाही.मनोजसोबत मी पहिल्यांदा काम केले आहे. त्याच्यासोबत कामाचा अनुभव जबरदस्त होता. मनोज वाजपेयीने रामगोपाल वर्माच्या सत्या सिनेमात काम केले नसते, तर मी, इरफान आणि नवाझुद्दीनसारख्या कलाकारांना आज जे स्थान मिळाले आहे, ते कदाचित मिळाले नसते.सिनेमात शिव्या आणि द्वैअर्थी शब्दांच्या वापराबद्दल तुला काय वाटते? त्यालाच अनुसरून दुसरा प्रश्न सिनेमा निवडताना तू कोणत्या गोष्टींवर खास लक्ष देतोस?सिनेमात कथेची गरज म्हणून अनेकदा शिव्यांचा वापर होतो. अनुराग कश्यपचे सिनेमा पाहिले,तर तुम्हाला कधीही जाणवणार नाही, की या शिव्यांचा वापर इथे का करण्यात आला आहे.सिनेमाची स्क्रिप्ट वाचल्यानंतरच चित्रपट स्वीकारावा की नाही हे मी ठरवतो. एकदा चित्रपट स्वीकारला की, व्यक्तिरेखेला योग्य न्याय देण्यासाठी त्या भूमिकेचा खूप अभ्यास करतो. समाजात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीचे लोक असतात. आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा लोकांचे आपण नेहमीच निरीक्षण करत असतो. त्यामुळे नायक अथवा खलनायक साकारताना मला माझ्या निरीक्षणाचा खूप उपयोग होतो. चित्रपटांसाठी मानधन किती घ्यायचे हे माझे चित्रपटांच्या बजेटवर ठरलेले असते. बिग बजेट सिनेमांसाठी मी जास्त मानधन घेतो, तर छोट्या सिनेमांसाठी खूप कमी. कारण छोट्या बजेटच्या निर्मात्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागते याची मला चांगलीच कल्पना आहे. माझ्यासाठी पैशापेक्षा चांगला चित्रपट महत्त्वाचा असतो.