Join us  

अमिषा पटेलविरोधात फसवणुकीचा गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 12:38 PM

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.  पैसे घेऊन कार्यक्रमाला न आल्याचा आरोप करत एका इव्हेंट कंपनीने अमिषासह अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे१६ नोव्हेंबर २०१७ रोजी एका वेडिंग सेरेमनीत अमिषाला डान्स करण्यासाठी बोलवण्यात आले होते. यासाठी तिला ११ लाख रूपये देण्यात आले होते. पण पैसे देऊनही अमिषा सेरेमनीत पोहोचली नाही

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.  पैसे घेऊन कार्यक्रमाला न आल्याचा आरोप करत एका इव्हेंट कंपनीने अमिषासह अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. अतिरिक्त महान्यायदंडाधिकारी न्यायालयात येत्या १२ मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार असून न्यायालयाने पाचही जणांना जातीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

आता हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ यात. इव्हेंट कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, १६ नोव्हेंबर २०१७ रोजी एका वेडिंग सेरेमनीत अमिषाला डान्स करण्यासाठी बोलवण्यात आले होते. यासाठी तिला ११ लाख रूपये देण्यात आले होते. पण पैसे देऊनही अमिषा सेरेमनीत पोहोचली नाही आणि ऐनवेळी तिचा डान्स परफॉर्मन्स रद्द करावा लागला. पवन कुमार वर्मा हे मुरादाबादेत एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतात. त्यांनीच ही तक्रार दाखल केली आहे.

पवन कुमार यांनी सांगितले की, अमिषा पटेलला आम्ही ११ लाख रूपये दिले होते. याशिवाय तिच्यासह पाच जणांचे एअर तिकिट, पचंतारांकित हॉटेलात मुक्कामाची व्यवस्था व बाऊंसरही तैनात करण्यात आले होते. या इव्हेंटसाठी अमिषा दिल्लीपर्यंत आलीही. पण दिल्लीत पोहोचल्यानंतर तिच्या असिस्टंटने आणखी २ लाख रूपयांची मागणी केली. दिल्ली ते मुरादाबाद अडीच तासांचा प्रवास आहे, असे तुम्ही आम्हाला खोटे सांगितले. हा प्रवास पाच तासांचा असल्याचे आम्हाला लोक सांगत आहेत. त्यामुळे आम्हाला आणखी २ लाख द्या. तरच आम्ही मुरादाबादला येऊ, असे हा अस्टिस्टंट म्हणाला. ऐनवेळी २ लाख देण्यास मी नकार दिला आणि अमिषा दिल्लीवरून माघारी परतली. यानंतर मी अमिषा व तिच्या अस्टिस्टंला माझे ११ लाख परत देण्यासाठी वारंवार फोन केलेत. पण त्यांनी माझ्या एकाही फोनचे उत्तर दिले नाहीत.

टॅग्स :अमिषा पटेल