Join us

‘रेस3’चे चौथे गाणे ‘पार्टी चले आॅन...’ रिलीज! गाण्यातील ‘पाऊट सीन’ एकदा पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 16:00 IST

‘रेस3’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे. आज या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे चौथे गाणे रिलीज झाले.

‘रेस3’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे. आज या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे चौथे गाणे रिलीज झाले. या गाण्यात सलमान खान, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शाह असे सगळे कलाकार आहेत. ‘पार्टी चले आॅन...’ असे बोल असलेले हे गाणे मिका सिंह आणि युलिया वंतूर यांनी गायले आहे. अलीकडे चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज झाला, त्या इव्हेंटमध्ये सलमान खान युलियासोबत याच गाण्यावर थिरकताना दिसला होता. विकी-हार्दिक यांनी गाण्याला संगीत दिले आहे. या गण्यात सलमान, जॅक, बॉबी, अनिल, डेजी असे सगळे पाऊट सीन देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा पाऊट सीन प्रचंड वेगाने व्हायरल होतो आहे. ‘रेस3’चे हे पार्टी साँग ऐकल्यावर त्याच्या तालावर तुम्ही आपोआप थिरकायला लागाल, हे आम्ही दाव्यानिशी सांगतोय. तेव्हा ऐका, पाहा आणि हे गाणे तुम्हाला कसे वाटले, ते नक्की कळवा.याआधी या चित्रपटाचे चार गाणी रिलीज झाली आहेत. पहिले ‘हिरीए’, दुसरे ‘सेल्फिश’ आणि तिसरे ‘अल्लाह दुहाई है’. या तिन्ही गाण्यांनी धूम केली आहे. आता चित्रपटातील हे चौथे पार्टी साँग किती धूम करते,ते बघूच.ALSO READ : सलमान खान का घेत नाही एकही सुट्टी? जाणून घ्यायचे तर वाचा बातमी!!‘रेस’ फ्रेंचाइजीचा हा तिसरा चित्रपट असून, त्यामध्ये सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनचा धमाका बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब  सलीम यासारख्या भारदस्त कलाकारांचा समावेश आहे. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी निर्मित या चित्रपटाला टिप्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनविण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले  आहे.