Join us  

लारा दत्ताने शेअर केला विनामेकअप लूक होतोय व्हायरल, पाहून चाहते फुल टू फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 7:25 PM

Lara Dutta Without Makeup Selfie: लग्नानंतर कौटुंबिक जबाबदा-यांमुळे लारा सिनेमांत जास्त झळकत नाही. फार कमी सिनेमात ती झळकत असल्यामुळे लारा दत्ताचे चाहते तिला नक्कीच मिस करतात.

लारा दत्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून  आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. लाराचा असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे.  सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. मॉर्निंग सेल्फी तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. लाराचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. विशेष म्हणजे फोटोत तिने अजिबात मेकअप केलेला नाहीय. 

त्यामुळे नॅचरल ब्युटी म्हणत चाहते तिच्या या फोटोला कमेंट्स देत आहेत.  विनामेकअपही लाराचे सौंदर्य पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला चाहते पंसती देतात. अगदी त्याचप्रमाणे तिच्या या नोमेकअप लूकची स्तुतीच केली आहे. तिच्या चेह-यावर कमालीचा आत्मविश्वास पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांत लाराने तिचे विनामेकअप लूकचं जास्त शेअर केले आहेत. 

लग्नानंतर कौटुंबिक जबाबदा-यांमुळे लारा सिनेमांत जास्त झळकत नाही. फार कमी सिनेमात ती झळकत असल्यामुळे लारा दत्ताचे चाहते तिला नक्कीच मिस करतात. तर दुसरीकडे लग्नानंतर तिचे करिअर थोडं मागे पडले, असाही लोकांचा गैरसमज झालेला आहे. यावर तिने सांगितले होते की, करिअर आणि कुटुंब दुहेरी जबाबदारी तुम्हाला पार पाडायची असते. अशावेळी त्यातील समतोल साधणं जास्त  गरजेचं असते. शेवटी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं हे तुमंच तुम्हीच ठरवायचे असते.

शेवची जीवनाच्या या टप्प्यावर वेळ माझ्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे. कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. जबाबदाऱ्या खूप वाढल्या आहे. त्यामुळेच जास्त सिनेमांच्या ऑफर्स स्विकारत नसल्याचे तिने म्हटले होते. तसेच डिजीटल माध्यमांची चलती आहे. त्यामुळे सिनेमापेक्षा वेबसिरीज करण्यावर जास्त पसंती देते.तसेच दिवसेंदिवस स्पर्धा खूप वाढत आहे.

 

रोज नवीन टॅलेट या क्षेत्रात येऊ पाहतं आहे. प्रत्येकालाच संधी मिळेल असेही नाही. त्यामुळे यश नाही मिळवता आले म्हणून निराश न होता अपयश पचवता आले पाहिजे. नवीन येणा-यांनाही एकच सांगेन की, एकाच गोष्टीवर अडून राहू नका. तसंच, स्वत:चं महत्त्व कमी होऊ देऊ नका. या सगळ्यांत तुमची स्वत:ची ओळख हरवू देऊ नका.

टॅग्स :लारा दत्ता