Join us

'पैशांसाठी काही करू शकते ही', प्रसिद्ध अभिनेत्रीच्या तिसऱ्या लग्नाबाबत पहिल्या नवऱ्याचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 14:35 IST

अभिनेत्रीच्या तिसऱ्या लग्नानंतर पहिल्या नवऱ्याने तिच्या वागणूकीवर केली टीका.

दाक्षिणात्य अभिनेते विजया कृष्ण नरेश आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश गेले अनेक महिने खूप चर्चेत आहेत. या चर्चांचे कारण म्हणजे त्यांचे नाते. काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करत ते लग्न करत असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.  नुकतेच त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. आता अभिनेत्री पवित्रा लोकेश यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीनं तिच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

नरेश यांची तिसरी पत्नी राम्या रघुपती यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता त्यांनी पवित्रा यांच्याशी चौथे लग्न केले. आधीच्या तीन लग्नांपासून नरेश यांना तीन मुले आहेत. पवित्रा यांचेही हे तिसरे लग्न आहे. पवित्रा यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरसोबत पहिले लग्न केले. त्यानंतर अभिनेता सुचेंद्र प्रसादबरोबर त्यांनी दुसरे लग्न केले होते. सुचेंद्र आणि पवित्रा यांना दोन मुले आहेत. आता त्यांचा आधीचा पती सुचेंद्र प्रसाद यांनी या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुचेंद्र प्रसाद यांनी म्हटले की, पवित्राला आलिशान आयुष्य जगायचे आहे आणि त्यासाठी ती काहीही करू शकते. ती खूप संधी साधू आहे. नरेशशी लग्न करण्यात तिचा नवा प्लान असणार. नरेशलाही पवित्राचे हेतू लवकरच समजतील. पवित्रा लोकेश चांगली व्यक्ती नाही. पैशासाठी ती काहीही करू शकते.

सुचेंद्र आणि पवित्रा यांचा २०१८ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर २०२१ पासून नरेश पवित्रा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मागील दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नरेश यांच्या चौथ्या लग्नाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.