Join us

चाहत्यांसोबत बेधुंद वरूण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:42 IST

मुंबईत सुरू असलेल्या १७ व्या जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये शनिवारी अभिनेता वरूण धवनच्या चाहत्यांना त्याच्या सोबत नाचून धम्माल ...

मुंबईत सुरू असलेल्या १७ व्या जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये शनिवारी अभिनेता वरूण धवनच्या चाहत्यांना त्याच्या सोबत नाचून धम्माल करण्याची संधी मिळाली. यावेळी वरूणने त्याचे आयुष्य बदलून टाकणार्‍या 'सॅटरडे सॅटरडे' विषयी माहिती दिली.तो म्हणाला, ' मी टीव्हीवर अनेकदा 'स्वर्ग' पाहिला. पण मला ठाऊकच नव्हते ही माझ्या वडिलांनी हा चित्रपट बनवला. 'गाईड' हा माझा अतिशय आवडता सर्वकालीन चित्रपट आहे. 'बदलापूर' नेहमीसाठी माझ्या स्मरणात राहील, मात्र ते एक दु:स्वप्न होते. असे वरूण म्हणाला.माझ्यावर जॉनी ब्राव्हो आणि स्वॅट कॅट्स या कार्टूनचा खूप प्रभाव असेही त्याने सांगितले.वरूण सध्या रोहित शेट्टीच्या 'दिलवाले'मध्ये भूमिका करीत आहे. यात शाहरुख खान, काजोल, कृती सेनन आदूंच्या भूमिका आहेत. काजोलविषयी तो म्हणाला, काजोलमध्ये वेगळी प्रतिभा आहे. तिच्यासारखी प्रतिभा कुठे दिसत नाही. तिची विनोदबुद्धी दाद देण्यासारखी आहे.