पुढील वर्ष अँडल्ट कॉमेडीचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:31 IST
जगप्रसिद्ध पोर्न स्टार ते बॉलिवूड स्टार असा प्रवास करणारी हॉट सनी लियोन याता हिंदी चित्रपटसृष्टीत बर्यापैकी स्थिरावली आहे. आगामी ...
पुढील वर्ष अँडल्ट कॉमेडीचे
जगप्रसिद्ध पोर्न स्टार ते बॉलिवूड स्टार असा प्रवास करणारी हॉट सनी लियोन याता हिंदी चित्रपटसृष्टीत बर्यापैकी स्थिरावली आहे. आगामी २0१६ हे वर्ष बॉलिवूडसाठी अँडल्ट कॉमेडीचे असेल, असे मत तिने अलीकडेच व्यक्त केले.'क्या कूल है मह ३', 'मस्तीजादे' आणि 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' हे पुढील वर्षी रिलीज होणारे चित्रपट पाहता सनीचे म्हणणे पटण्यासारखे आहे. 'मस्तीजादे' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सनी सहअभिनेता वीर दाससह उपस्थित होती.या वेळी ती म्हणाली, ''पुढील वर्षी एकाच विषयावर एकापाठोपाठ येणार्या चित्रपटांमुळे कॉमेडीचा नवा ट्रेंड निर्माण होण्याची शक्यता आहे. 'मस्तीजादे'मध्ये मी लैला आणि लिली या जुळ्या बहिणींचा डबल रोल साकारत आहे. यापैकी लैलाची भूमिका आव्हानात्मक होती.''सनीसह तुषार कपूरची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पुढील वर्षी २९ जानेवारीला रिलीज होत आहे.