शाहरूखचा ‘फ्लार्इंग हाय’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 09:50 IST
शाहरूख खानचे फॅन्स सध्या त्याच्या आगामी दोन चित्रपटांमुळे भलतेच उत्सुक आहेत ते म्हणजे ‘फॅन’ आणि ‘रईस’. हे दोन्ही चित्रपट ...
शाहरूखचा ‘फ्लार्इंग हाय’ !
शाहरूख खानचे फॅन्स सध्या त्याच्या आगामी दोन चित्रपटांमुळे भलतेच उत्सुक आहेत ते म्हणजे ‘फॅन’ आणि ‘रईस’. हे दोन्ही चित्रपट बिग बजेट असल्यामुळे सर्वांचे चित्रपटाकडे लक्ष लागून राहिले आहे.१५ एप्रिल रोजी ‘फॅन’ रिलीज होणार असून शाहरूख तरीही राहुल ढोलकिया यांच्या ‘रईस’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. यातच नवाजुद्दीन सिद्दीकी आणि महिरा खान हे आहेत. शाहरूखने सेटवरील एक फोटो अपलोड केला आहे.‘फ्लार्इंग हाय’ असे कॅप्शन देऊन हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याने लिहिले आहे की,‘ अॅक्शन डायरेक्टर रवी सर अॅण्ड सिनेमॅटोग्राफी टीम आॅफ मोहनन सर इज मेकिंग मेकिंग मी फ्लाय. फिल्टर येस... वायर्स नो!’ रईस ३ जुलै रोजी रिलीज होणार आहे.