Flashback : गुलशन ग्रोव्हरने म्हटले, कॅटरिनासोबत बोल्ड सीन्स देण्यासाठी करावी लागली प्रॅक्टिस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 16:51 IST
२००३ मध्ये आलेल्या ‘बूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री कॅटरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वाधिक हॉटेस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. या ...
Flashback : गुलशन ग्रोव्हरने म्हटले, कॅटरिनासोबत बोल्ड सीन्स देण्यासाठी करावी लागली प्रॅक्टिस!
२००३ मध्ये आलेल्या ‘बूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री कॅटरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वाधिक हॉटेस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. या चित्रपटात तिने अभिनेता गुलशन ग्रोव्हरसोबत अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. जेव्हा गुलशन ग्रोव्हरला एका मुलाखतीदरम्यान याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी चित्रपटातील बिहाइंड द इंटिमेट सीन्सवर मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी म्हटले की, कॅटरिनासोबत परफेक्ट बोल्ड सीन्स देताना मला प्रॅक्टिस करावी लागली. गुलशन ग्रोव्हरने म्हटले की, चित्रपटात मला कॅटरिनासोबत रोमॅण्टिक सीन्स करायचे होते. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या समोर हे सीन्स द्यावे लागणार असल्याने ते परफेक्ट करण्याचे माझ्यावर प्रचंड दडपण होते. मला कुठल्याही परिस्थितीत सर्व बोल्ड सीन्स एकाच टेकमध्ये परफेक्ट द्यायचे होते. त्यामुळे सीन्स देण्याअगोदर मी बराच वेळ याची प्रॅक्टिस करीत होतो. यासाठी मला कॅटरिनानेही प्रचंड सहकार्य केले. खरं तर हे सीन्स आॅन कॅमेरा देणे माझ्यासाठी खूपच कठीण होते. कारण मला अशा अॅक्ट्रेससोबत सीन्स द्यायचे होते, जी या चित्रपटातून डेब्यू करणार होते. मात्र अखेरीस माझी मेहनत यशस्वी झाली, मी सर्व सीन्स परफेक्ट दिले. मला आठवते की, जेव्हा हे सीन्स आॅनलाइन रिलीज करण्यात आले होते, तेव्हा ३० ते ४० मिलियन व्ह्यूज मिळाले होते. हे ऐकूणच मी आनंदी झालो होतो. मनातून समाधान वाटत होते. दरम्यान, सध्या कॅटरिना बॉलिवूडमधील टॉप मोस्ट अभिनेत्रींपैकी एक असून, ‘बूम’नंतर तिने एकाही चित्रपटात एवढे बोल्ड सीन्स दिले नाहीत. सध्या कॅटरिना सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा हैं’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याव्यतिरिक्त ती अभिनेता आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन स्टारर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.