अभिनेत्री सोनम कपूर सध्या फिटनेसवर जरा जास्तच लक्ष देत आहे. काही दिवसांपूर्वी सोनम एरियल योगाभ्यास करत असल्याचंही समोर आलं होतं.. ऑस्ट्रियामध्ये सुट्टीची मजा घेत असतानाही फिटनेसवर खास लक्ष देत होती. काहीही झालं तरी वर्कआऊट चुकवायचं नाही असा निर्धारच सोनमनं जणू काही केला आहे.त्यामुळंच की काय आता कान्स फिल्म फेस्टिव्हलला जाताना ती आपल्या फिटनेस ट्रेनरला सोबत घेऊन जाणार आहे.. राधिका कार्ले ही सोनमची खास फिटनेस ट्रेनर आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनम तिच्याकडूनच एरियल योगाभ्यासाचे धडे घेतेय. त्यामुळंच कान्समध्येही तिला फिटनेसचा एकही दिवस मिस करायचा नाही. खरंच मानलं बुवा सोनम.
'फिटनेस कॉन्शियस' सोनम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 13:35 IST