Join us

रसिका दुग्गलचे हे आहे पहिले प्रेम, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:00 IST

अभिनेत्री रसिका दुग्गलने सिनेमा हेच माझे फर्स्ट लव्ह आहे, पण मी माध्यमाला महत्त्व देतच नसल्याचे सांगितले.

ठळक मुद्देरसिका दुग्गलचे सिनेमा हेच माझे फर्स्ट लव्ह

अभिनेत्री रसिका दुग्गलने सिनेमा हेच माझे फर्स्ट लव्ह आहे, पण मी माध्यमाला महत्त्व देतच नसल्याचे सांगितले. ती म्हणाली की, माझ्यासाठी सिनेमाचा आशय जास्त महत्त्वाचा आहे. रसिकाने २००७ मध्ये अनवरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर गेल्या वर्षी तिचा मंटो चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. त्यामध्ये पावडर, पीओडब्लू – बंदी युद्ध के आणि किस्मत या मालिकेमध्येही तिला चांगला रोल मिळाले होते.

रसिकाने मालिकेतही काम केले असून याबद्दल ती म्हणाली की, मी चित्रपटांमध्ये खूप कमी काम केले आहे, ज्यावेळी मी पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यावेळी मालिकेत काम केले होते. मात्र त्यावेळी देखील मला फुल टाइम काम मिळाले नाही. रसिकाने पुढे सांगितले की, माझ्यासाठी पहिले प्रेम नेहमीच चित्रपट आहे. मी नाटकातदेखील काम केले आहे. माझ्यासाठी माध्यम महत्त्वाचे नाही. कंटेट चांगला असायला पाहिजे. 

रसिकाने दिल्ली पोलीस नावाच्या एका वेब सीरिजमध्येही काम केले आहे. त्यामध्ये तिने चक्क पोलीस इन्स्पेक्‍टरचा रोल साकारला आहे. याशिवाय एजाज खान दिग्दर्शित हमिदमध्येही ती दिसणार आहे. ही एका अशा स्त्रीची कथा आहे, जिचा नवरा एके दिवशी अचानक गायब होतो आणि तिच्या मुलाच्या डोक्‍यावरून पित्याचे छत्र हरपते. वडील अल्लाकडे गेले असे त्याला सांगितले जाते, तर 786 हा अल्लाचा क्रमांक असल्याचे त्याला आईकडून समजते. त्यानंतर त्या मुलाच्या मनातील कुतुहल दाखवणारी ही कथा आहे.

टॅग्स :मंटो