Join us  

Liger First Look: विजय देवरकोंडा-अनन्या पांडेच्या 'लायगर'चा फर्स्ट लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 1:48 PM

फर्स्टलूक आज सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा आगामी सिनेमा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आता त्याचे नाव आणि फर्स्ट लूक आऊट  झाला आहे. या अ‍ॅक्शनने भरलेल्या सिनेमाचे नाव 'लायगर' असेल. धर्म प्रोडक्शन आणि विजय देवेराकोंडानी सोमवारी 18 जानेवारी सोशल मीडियावर पहिला लूक शेअर केला आहे.

सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करताना विजय देवेराकोंडाने ट्विटरवर लिहिले की, ''विनम्रतेने संपूर्ण भारतरात आमच्या आगमनचा घोषणा करतो. फर्स्ट लूक शेअर करताना विजय बॉक्सिंगचे ग्लोव्ह्ज घालून रागात बघतो आहे. त्याच्या बॅकग्राऊंडला वाघ आणि  सिंहाचा फोटो दिसतो आहे. 

या सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. 'लायगर' मध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे आहे. अनन्या पहिल्यांदाच विजय देवरकोंडा सोबत काम करताना दिसणार आहे. त्या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेसह यात  रम्या कृष्णन, रोनित रॉय, विशु रेड्डी, आली आणि गेटअप श्रीनु मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनसह पुरी जगन्नाथ, अपूर्व मेहता आणि अभिनेत्री चार्मी कौर यांनी केली आहे.

टॅग्स :विजय देवरकोंडाअनन्या पांडे