Join us

अखेर ऐश्वर्या राय-बच्चनची इन्स्टाग्रामवर एंट्री; सर्वात अगोदर ‘या’ सेलिब्रिटीने केले तिला फॉलो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 18:12 IST

ऐश्वर्या राय-बच्चनने अखेर इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. ऐशने एंट्री करताच काही क्षणातच हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी तिला फॉलो केले आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन नेहमीच लाइमलाइट आणि मीडियापासून दूर राहणे पसंत करते. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडी लोकांसोबत शेअर करण्यास तिने कधीच रुची दाखविली नाही. मात्र आता वयाच्या ४४ व्या वर्षी तिने पहिल्यांदा एक असे काम केले, ज्यामुळे चाहत्यांना तिच्याबद्दल सर्व माहिती मिळू शकेल. सध्या ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्स येथे आहे. याठिकाणी ऐश्वर्या रेड कार्पेटवर आपल्या अदा दाखविणार आहे. मात्र तिने फ्रान्सला जाण्याअगोदरच इन्स्टाग्रामवर एंट्री केल्याने तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच उत्साहाचे वातावरण आहे. ऐशने जेव्हा इन्स्टावर एंट्री केली तेव्हा काही मिनिटांतच फॉलोअर्सचा आकडा हजाराच्या घरात पोहोचला. सेलिब्रिटींमध्ये तिला सर्वात अगोदर निर्माते निखिल त्रिवेदी यांनी फॉलो केले. बॉलिवूडमधील बरेचसे कलाकार अजूनही सोशल मीडियापासून दूर आहेत. त्यामध्ये करिना कपूर-खान, सैफ अली खान, आदित्य रॉय आणि राणी मुखर्जी यांच्या नावांचा समावेश आहे. ऐश्वर्यानेदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर येण्याचा निर्णय करण जोहर आणि मनीष मल्होत्रा यांच्या सांगण्यावरून घेतला. दरम्यान, ऐश्वर्याने तिच्या अकाउंटवरून एकही फोटो शेअर केला नाही.  दरम्यान, ऐश पुन्हा एकदा आपल्या फिल्मी ट्रॅकवर परतली आहे. आराध्याच्या जन्मानंतर ती बराच काळ पडद्यावरून गायब होती. आता ती पुन्हा चित्रपटांमध्ये सक्रिय झाली असून, आगामी काळात तिच्या अदा चाहत्यांना बघावयास मिळणार आहेत. दरम्यान, ऐशने इन्स्टावर डेब्यू केल्याने तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण आहे. लवकरच ती अनिल कपूरसोबत झळकणार आहे.