Join us  

यामी गौतमने काढली नाराज चाहत्यांची समजूत, लिहिले खुले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 11:25 AM

वाचा, काय आहे खास

ठळक मुद्दे आयुषमान खुराणा, यामी गौतम व भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बाला’ हा सिनेमा गतवर्षी 7 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता.

अभिनेत्री यामी गौतम हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. चाहतेही यामीवर फिदा आहेत. म्हणूनच नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर अवार्ड सोहळ्यात यामीला नामांकन न मिळाल्याचे पाहून चाहते बिथरले. होय, ‘बाला’ या चित्रपटातील सहज सुंदर अभिनयासाठी किमान यामीला फिल्मफेअर नामांकन मिळेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण चाहत्यांची निराशा झाली आणि अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. चाहत्यांच्या या नाराजीची दखल घेत, आता खुद्द यामीने खुले पत्र लिहिले आहे.

होय, यामीने इन्स्टाग्रामवर एक खुले पत्र लिहिले. तिने लिहिते, ‘बाला या चित्रपटासाठी मला नामांकन न मिळाल्याने चाहते दुखावले. मला अनेकांचे मॅसेज मिळालेत. त्यामुळे मी हे पत्र लिहितेय. प्रामाणिकपणे सांगायचे तर पुरस्कार जिंकल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. तर नामांकन हा तुमचे कष्ट आणि तुमची क्षमतेचा सन्मान असतो. आदरणीय ज्युरींनी मला नामांकन दिले नाही. त्यांचा निर्णय मी मोठ्या मनाने स्वीकारते. यावर्षी मला इंडस्ट्री, क्रिटीक्स, मीडिया आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. हे प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मला सतत काम करण्यासाठीची पुरेसे आहे. तुम्ही कुठून आला, कोण आहात, याने काहीही फरक पडत नाही. फक्त हार मानू नका आणि पुढे जात राहा..., ’असे यामीने लिहिले.

आयुषमान खुराणा, यामी गौतम व भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बाला’ हा सिनेमा गतवर्षी 7 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटासाठी आयुषमान खुराणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी तर अभिनेत्री सीमा पाहवा हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

टॅग्स :यामी गौतम