Join us  

आत्महत्या करण्याच्या काही तास अगोदरच सिल्क स्मितासोबत घडले असे काही...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 12:30 PM

साउथ चित्रपटांची सेक्सी सायरन म्हणून ओळखली जाणारी सिल्क स्मिता आज जरी या जगात नसली तरी, लोक तिला आजही तिच्या ...

साउथ चित्रपटांची सेक्सी सायरन म्हणून ओळखली जाणारी सिल्क स्मिता आज जरी या जगात नसली तरी, लोक तिला आजही तिच्या सल्ट्री लूक आणि सेक्सी अवतारासाठी स्मरण करत असतील यात शंका नाही. खरं तर सिल्क एक अशी अभिनेत्री होती, जिने केवळ चारच वर्षांत जवळपास दोनशेपेक्षा अधिक चित्रपट करून स्टारडमचा नवा अध्याय लिहिला. सिल्क स्मिताला एक कॅरेक्टर अभिनेत्री बनायचे होते. परंतु निर्मात्यांनी तिला नेहमीच ग्लॅमरस भूमिका दिल्या. अशातही सिल्कने कधीच कुठल्या भूमिकेसाठी नकारघंटा वाजविली नाही. त्यामुळे तिच्या प्रगतीत दिवसागणिक वाढ होत गेली. तिच्या या प्रगती आणि स्टारडममुळे एक गट आनंदी होता, तर एक गट तिच्यावर प्रचंड तिरस्काराची भावना ठेवून होता. पुढे अचानकच एकेदिवशी सिल्क स्मिताने आत्महत्या करीत या जगाचा निरोप घेतला. तिच्या या अचानक आलेल्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण साउथ इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, अजूनही तिच्या आत्महत्येचे कारण कोणालाही समजू शकले नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की आत्महत्त्या करण्याच्या काही तास अगोदरच सिल्क स्मिताने कन्नड अभिनेता आणि तिच्या खास मित्राला फोन केला होता. कारण फोन करण्याच्या काही तासानंतरच सिल्क स्मिताने आत्महत्त्या केल्याची बातमी समोर आली होती. याबाबतचा खुलासा कन्नड चित्रपटांमधील वेटरन अभिनेता आणि सिल्क स्मिताचा खास मित्र रविचंद्रनने केला आहे. २०१४ मध्ये एका कन्नड चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रविचंद्रनने सिल्क स्मिता आणि तिच्या कॉलचा उल्लेख करताना म्हटले होते की, ‘२३ सप्टेंबर १९९६ ची ही गोष्ट आहे. त्यादिवशी मी शूटिंगमध्ये व्यस्त होतो. त्यादिवशी मला सिल्कने बºयाचदा कॉल केल्याचे बघून मी आश्चर्यचकित झालो होतो. त्यानंतर मी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्याने माझे तिच्याशी बोलणे झाले नाही. त्यावेळी मला असे वाटले की, सिल्क नेहमीप्रमाणे मला फोन करीत असावी. परंतु दुसºया दिवशी मला कळाले की, सिल्कने आत्महत्या केली. ही बातमी माझ्यासाठी खूपच धक्कादायक होती. रविचंद्रनला अजूनही या गोष्टीची खंत आहे की, त्यादिवशी अखेर सिल्क स्मिताला आपल्याला काय सांगायचे होते? अखेर ती कुठल्या गोष्टीमुळे त्रस्त होती? सिल्क स्मितावर कोणी प्रेशर टाकण्याचा तर प्रयत्न करीत नसावा ना? असे कित्येक प्रश्न रविचंद्रनला त्रस्त करीत आहेत. परंतु आता त्याचे उत्तर मिळणे अवघड असून, हे प्रश्न कायमच प्रश्न राहतील याची जाणीवही रविचंद्रनला आहे. खरं तर सिल्क स्मिताने जेवढ्या झपाट्याने प्रगतीचे दरवाजे उघडले होते, तेवढ्याच वेगाने तिचे विरोधक निर्माण झाले होते. त्यामुळे प्रगती करूनही सिल्क तिच्या व्यक्तिगत आयुष्यात एकाकी जीवन जगत होती. असा एकही व्यक्ती तिच्या आजूबाजूला नव्हती, जी तिच्यावर प्रेम करू शकेल. सिल्कच्या कुटुंबातील सदस्यांनी तर तिला वाºयावर सोडले होते. पुढे एकटेपणामुळे ती नशेच्या आहारी गेली. अखेर एक दिवस तिने अतिशय रहस्यमयरीत्या या जगाचा निरोप घेतला. परंतु असे असताना हे आजपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही की, सिल्कचा मृत्यू नेमका कशाने झाला? असे म्हटले जाते की, सिल्कने पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सिल्कच्या जीवनावर आधारित अभिनेत्री विद्या बालन हिची प्रमुख भूमिका असलेला ‘द डर्टी पिक्चर’ काढण्यात आला आहे. यामधून सिल्कचे जीवन मांडण्याचा प्रयत्न केला आहे.