Join us

​ ‘बाप से बेटा सवाई’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 16:41 IST

‘लॅक्मे फॅशन विक’च्या पाचव्या दिवशी रॅम्पवर ‘बाप से बेटा सवाई’ असेच काहीसे चित्र दिसले. होय, अभिनेता इमरान हाश्मी त्याचा ...

‘लॅक्मे फॅशन विक’च्या पाचव्या दिवशी रॅम्पवर ‘बाप से बेटा सवाई’ असेच काहीसे चित्र दिसले. होय, अभिनेता इमरान हाश्मी त्याचा मुलगा आयानसोबत रॅम्पला उतरला. या बापलेकाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. वडिलांसारखाच रूबाब व स्टाईल घेऊन आयानने अतिशय आत्मविश्वासाने रॅम्प वॉक केले आणि सरतेशेवटी उपस्थितांना फ्लाइंग किस देऊन टाळ्या घेतल्या. वडिलांप्रमाणे माझ्यातही सुपरस्टार होण्याचे सर्व गुण आहेत, हेच जणू चिमुकल्या आयानने दाखवून दिले.  शो संपल्यानंतर इमरानने माध्यमांशी संवाद साधला. आयानला लाइमलाइट आणि स्टेज आवडतात. अभिनेता व्हायचं, हे त्याने आधीच ठरवून टाकले आहे. मी माझ्या अपेक्षांचे कुठलेही ओझे त्याच्यावर लादत नाही. मला तो काहीही झालेला चालेल. पण सध्या तरी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवेल, असेच मला वाटते आहे, असे इमरान यावेळी गमतीने म्हणाला.