नशेत धुंद असणाऱ्या फरहानने क्लबमध्ये असा घातला होता गोंधळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 10:55 IST
अॅक्टर, डिरेक्टर, सिंगर, अँकर, लेखक अशा मल्टीटॅलेंटेड फरहान अख्तरला का बरं कोणी हाकलून लावेल? परंतु प्रत्येकाला तरुणपणी असे अनुभव ...
नशेत धुंद असणाऱ्या फरहानने क्लबमध्ये असा घातला होता गोंधळ...
अॅक्टर, डिरेक्टर, सिंगर, अँकर, लेखक अशा मल्टीटॅलेंटेड फरहान अख्तरला का बरं कोणी हाकलून लावेल? परंतु प्रत्येकाला तरुणपणी असे अनुभव येतात. फरहानसुद्धा त्याला अपवाद नाही. नुकतेच त्याला जेव्हा एका चॅट शोवर विचारण्यात आले की, तुला कधी एखाद्या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले का? यावर त्याने प्रामाणिक उत्तर दिले- हो.घटना १९९६ची आहे जेव्हा फरहान आजच्यासारखा स्टार ‘फरहान अख्तर’ बनलेला नव्हता. कॅनडातील टोरोंटो शहरात तो मित्रांसोबत एक क्लबमध्ये मौजमस्ती करायला गेला. तो सांगतो, ‘आजच्यासारखा मी समजदार वगैरे काही नव्हतो. मित्रांसोबत असल्यामुळे क्लबमध्ये आमची एकदम धमाल चालू होती. त्यामुळे कळालेच नाही की मला जरा जास्तच झालीए. नशेत स्टेजवर जाऊन मी बँडसोबत गाऊ लागलो, लोकांच्या टेबलवर जाऊन त्यांना नाचण्यासाठी ओढू लागलो. माझा वात्रटपणा जेव्हा त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला तेव्हा त्यांनी मला क्लबच्या बाहेर काढले.’बरं तो तर्र नशेत असल्यामुळे त्याला वाईट वाटण्याचे काही कारणच नव्हते. तो म्हणतो, ‘तरुणवयात आपण अशा गोष्टी करतच असतो. मला जर तुम्ही त्यावेळी पाहिले असते तर तुम्हाला वाटलेच नसते की, मी आज जसा आहे तसा कधी होऊ शकतो. एका जागेवर टिकणे मला तर शक्यच नव्हते. एकमद ‘बेफिक्रा’ होतो मी.’ मल्टीटॅलेंटेड : फरहान अख्तरत्याचे मित्रसुद्धा ही गोष्ट मान्य करतात. ते सांगतात, तो जीवनाच्याबाबतीत कधीच सिरियस नव्हता. त्याला काय करायचे हे निश्चित नव्हते. त्यामुळे त्याने जेव्हा २००१ साली आमिरसोबत ‘दिल चाहता है’ चित्रपट बनवला तेव्हा आम्हाला विश्वासच बसला नाही. त्याच्यामध्ये आलेला हा बदल सर्वांसाठी मोठा धक्का होता.आज फरहान देशातील अग्रणी फिल्ममेकर्सपैकी एक आहे. ‘लक्ष्य’ आणि ‘डॉन सिरीज’चे दिग्दर्शन तर ‘रॉक आॅन’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ अशा चित्रपटांतून त्याने अभिनय केला आहे. एक यशस्वी निर्माता म्हणून त्याने आपली ओळख बनवली आहे. या वर्षी त्याचे ‘वझीर’ आणि ‘रॉक आॅन २’ हे चित्रपट प्रदर्शित झाले.