Join us  

फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर आली चर्चेत, सेक्सी फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 4:50 PM

ही अभिनेत्री बोल्ड व सेक्सी फोटोंमुळे चर्चेत येत असते.

शिबानी दांडेकर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. मग स्पेशल फंक्शनच्या वेळी केलेलं ड्रेसिंग असेल किंवा फोटोशूट्स. शिबानी दांडेकर आपल्या स्टाईल स्टेटमेंट आणि स्वतःला कोणत्याही आऊटफिटमध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं कॅरी करत आपल्या चाहत्यांना इंप्रेस करण्याची संधी सोडत नाही. त्यात सध्या ती फरहान अख्तरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. मात्र शिबानीने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. 

शिबानीने इंस्टाग्राम शेअर केलेला फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. या फोटोत सुपर हॉट शॉर्ट पॅण्ट व शोल्डर टॉपमध्ये ती दिसते आहे. शिबानीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. तिच्या चाहत्यांना हा फोटो आवडला आहे. 

फरहान अख्तर व शिबानी दांडेकर या  ‘लव्ह बर्ड्स’चा रोमान्स सध्या जोरात सुरु आहे. हे नाते आताश: कुणापासूनही लपून राहिलेले नाही.

गतवर्षी या कपलने आपले नाते जगजाहिर केले आणि यानंतर फरहान-शिबानी अगदी ‘खुल्लम खुल्ला’ गळ्यात गळा घालून हिंडू फिरू लागलेत.  

पहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला. आता तर हे कपल लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे. 

शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात ती दिसली होती.

शिबानी दांडेकर अभिनयासोबतच गाणं सुद्धा गाते.

टॅग्स :शिबानी दांडेकरफरहान अख्तर