Join us  

हिरेजडीत ड्रेस अन् 82 हजारांची सँडल; शिबानीचा लग्नातील थाट पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 5:09 PM

Shibani dandekar: शिबानीने तिच्या लग्नात हँड एम्ब्रॉयडरी असलेला डिझायनर ड्रेस परिधान केला होता. विशेष म्हणजे हा ड्रेस साधासुधा नसून प्रचंड महाग होता.

सध्या सोशल मीडियावर  फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचं लग्न हॉट टॉपिकपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. गेल्या कित्येक दिवसांपासून नेटकऱ्यांमध्ये या लग्नाचीच चर्चा आहे. अगदी लग्नात आलेल्या पाहुण्यांपासून ते फरहानच्या लेकींपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. यामध्येच आता लग्नामध्ये शिबानी दांडेकरने परिधान केलेल्या डिझायनर गाऊनची चर्चा रंगली आहे.

शिबानीने तिच्या लग्नात हँड एम्ब्रॉयडरी असलेला डिझायनर ड्रेस परिधान केला होता. विशेष म्हणजे हा ड्रेस साधासुधा नसून प्रचंड महाग होता. इतंकच नाही तर या ड्रेसवर सोनं आणि डायमंड बसवण्यात आले होते. 

काय आहे शिबानीच्या ड्रेसचं वैशिष्ट्य?

शिबानीने तिच्या लग्नात लाल रंगाचा डिझायन गाऊन परिधान केला होता. हा गाऊन क्रोसेट टॉपसह फिटेड स्कर्टमध्ये होता. शिबानीने या ड्रेसवर मॅचिंग असे गोयंका इंडियाच्या रुबी डँगलर्सचे इअरिंग्स घातले होते. हे इअरिंग्स १८ कॅरेट सोन्यामध्ये तयार करण्यात आले होते. तसंच तिच्या या ड्रेसवर ५५० पेक्षा अधिक व्हाइट डायमंड आणि रोज कट डायमंड बसवण्यात आले होते. इतकंच नाही तर  स्ट्रॅप्सवरदेखील १०५ क्रिस्टल लावण्यात आले होते. 

दरम्यान, या लग्नसोहळ्यात शिबानीचा थाट पाहण्यासारखा होता. तिचे सॅण्डल्सदेखील प्रचंड महाग होते. जवळपास ८२ हजार रुपयांचे सॅण्डल तिने पायात घातले होते. 

टॅग्स :शिबानी दांडेकरफरहान अख्तरबॉलिवूडसेलिब्रिटी