Join us  

फरहान अख्तरने शूटिंग सुरु होण्यापूर्वीच सोडला अजय देवगणचा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 5:26 AM

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर अजय देवगणचा चित्रपट जिगर ठंडामधून काढता पाय घेतला आहे. अजय देवगण आणि फरहान अख्तरचे या ...

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर अजय देवगणचा चित्रपट जिगर ठंडामधून काढता पाय घेतला आहे. अजय देवगण आणि फरहान अख्तरचे या चित्रपटा संदर्भात आधीच बोलणं झाले होते. मात्र फरहानेन अचानक या चित्रपटातून वॉक आऊट केले आहे. अजय देवगणला यामुळे अडचण निर्माण होऊ शकते. चित्रपट जिगर ठंडा अजय देवगण तयार करतो आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन निशीकांत कामत करणार आहे. अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटाचे दिग्दर्शन ही त्यांनेच केले होते. चित्रपट अचानक सोडण्याचे कारण फरहान अख्तरचे बिझी शेड्यूल सांगण्यात येते आहे.  या चित्रपटात साउथचा रिमेक आहे. या चित्रपटात आधी काम करण्यासाठी फरहान उत्सुक होता त्यामुळे त्यांने अचानक काढता पाय घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.  फरहानने म्हटले होते की, निशीकांत सोबत काम करण्यास मी खूपच उत्सुक आहे. कारण त्यांने अजय देवगणच्या दृष्यम चित्रपटाचे दिग्दर्शन खूपच चांगले केले होते. चित्रपट एका दिग्दर्शकाच्या संघर्षावर आधारित आहे. यात फराहन अख्तरला दिग्दकर्शकाची भूमिका देण्यात आली होती. या चित्रपटात संजय दत्तची ही मुख्य भूमिका आहे. फराहनसोबत काम करण्यास संजय दत्त ही खूपच उत्सुक होता. अजयच्या 'जिगर ठंडा'ची शूटिंग जानेवारीपासून सुरु होणारी होती. मात्र फरहानने अजयच्या आशांवर पाणी फेरले आहे. ALSO READ :  ​या गोष्टीचा फरहान अख्तरला आजही होतो पश्चातापअजय देवगण लवकरच साउथची सनसनी असलेल्या राकुल प्रित सिंगसोबत लव रंजनच्या रोमॅण्टिक कॉमेडीत बघावयास मिळणार आहे. राकुल प्रित सिंग सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘अय्यारी’ या चित्रपटातही झळकणार आहे. अजय देवगण आणि राकुलच्या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटात ती एका शहरी मुलीची भूमिका साकारणार आहे. राकुल प्रीत सिंग मिस इंडिया राहिलेली आहे. या दोन्ही कलाकारांचे वैशिष्ट्ये म्हणजे अजय देवगणचे वय ४८ वर्ष इतके असून, राकुल २७ वर्षांची आहे. या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात तब्बूदेखील बघावयास मिळणार आहे. चित्रपटाला टी-सीरिजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार तथा लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग प्रोड्यूस करणार आहेत