Join us  

फरहान अख्तर व शिबानी दांडेकर नववर्षांत बांधणार लग्नगाठ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 1:19 PM

गतवर्षांत अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या कपलच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. या नव्या वर्षांत मात्र या कपलच्या लग्नाची चर्चा रंगतेय. होय, फरहान व शिबानी या वर्षांत विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे.  

ठळक मुद्देफरहान व शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आता फरहानच्या मुलांनीही (पहिली पत्नी अधुनापासून झालेली मुलं)हे नाते मनापासून स्वीकारले आहे.

गतवर्षांत अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या कपलच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. या नव्या वर्षांत मात्र या कपलच्या लग्नाची चर्चा रंगतेय. होय, फरहान व शिबानी या वर्षांत विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे.    फरहान व शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आता फरहानच्या मुलांनीही (पहिली पत्नी अधुनापासून झालेली मुलं)हे नाते मनापासून स्वीकारले आहे. होय,  शिबानी नुकतीच फरहानची मुलांसोबत वेळ घालवताना दिसली.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी आपल्या नात्याबद्दल  गंभीर आहेत.  फरहानच्या मुलांनादेखील शिबानी आवडते. त्यामुळे ते दोघंही नक्कीच पुढचा विचार करतील. 

फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत.  गत सप्टेंबरपासून फरहान व शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चचेर्ला तोंड फोडले होते. या फोटोत फरहान पाठमोरा होता. म्हणजे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण हा फरहान आहे, हे ओळखायला लोकांना वेळ लागला नव्हता.

यानंतर तर होय, तो मीच, असे खुद्द फरहाननेचं जाहिर केले होते. फरहान  तूर्तास ‘द स्काज इज पिंक’च्या शूटींगमध्ये तो बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर  गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल आहे.  

टॅग्स :फरहान अख्तरशिबानी दांडेकर