Join us  

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर दिसले रोमांन्स करताना, फोटोवरील हृतिक रोशनच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 1:35 PM

दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर  सोशल मीडियावर आपल्या फोटोंमुळे चर्चेत असतात. दोघे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पुन्हा एकदा त्यांच्या रोमँटिक फोटोमुळे ते चर्चेत आले आहे. शिबानीने ख्रिसमस निमित्त फराहनसोबतचा एक क्युट सेल्फि पोस्ट केला आहे. या फोटोवर अभिनेता ह्रतिक रोशन कमेंट केली आहे. तसेच शिबानीची बहीण अनुषा दांडेकरनेसुद्धा मजेदार कमेंट केली आहे. 

बहिणीने केली तक्रार शिबानी दांडेकरने या फोटोसोबत लिहिले, आमच्याकडून तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा. यावर हृतिक रोशनने ब्युटीफुल अशी कमेंट केली आहे. शिबानीची बहीण अनुषा दांडेकरने लिहिले , पण आम्ही या फोटोत नाहीत आहोत. दीया मिर्झानेही फोटोवर कमेंट केली आहे. 

शिबानी अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आहे. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. दोघे रोमँटिक व्हॅकेशनवर जात असतात.  फरहानच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो तर तो प्रियांका चोप्रासमवेत अभिनेता शेवटच्या काळात ‘द स्काई इज पिंक’ या चित्रपटात दिसला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारसे कामगिरी केली नाही. आगामी प्रोजेक्टबद्दल बोलताना दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहराच्या 'तूफान' चित्रपटात दिसणार आहे. 

टॅग्स :शिबानी दांडेकरफरहान अख्तर