श्रीदेवी यांना झी सिनेमा देणार ‘फॉरेव्हर श्रीदेवी’ या कार्यक्रमाद्वारे आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 14:35 IST
२४ फेब्रुवारीला भारताची सुपरस्टार नायिका श्रीदेवीच्या धक्कादायक आणि अनपेक्षित मृत्यूच्या बातमीने साऱ्या भारतात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. श्रीदेवी ...
श्रीदेवी यांना झी सिनेमा देणार ‘फॉरेव्हर श्रीदेवी’ या कार्यक्रमाद्वारे आदरांजली
२४ फेब्रुवारीला भारताची सुपरस्टार नायिका श्रीदेवीच्या धक्कादायक आणि अनपेक्षित मृत्यूच्या बातमीने साऱ्या भारतात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. श्रीदेवी यांनी १९७१ला ‘पूम्बट्टा’ या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले. त्यांना भारतातील पहिल्या महिला सुपरस्टार म्हटले जात असे. अप्रतिम सौंदर्य, दिलखेचक अदा आणि सर्वांचे मन घायाळ करणारे स्मितहास्य यातून कोणत्याही भूमिकेत त्या सहजगत्या शिरत असत. श्रीदेवी यांनी त्यांचे व्यवसायिक आणि वैयक्तिक आयुष्य नेहमीच वेगवेगळे ठेवले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी कधीच त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे श्रीदेवी या व्यक्ती म्हणून कशा होत्या हे त्यांच्या चाहत्यांना माहीतच नाहीये. त्यांच्या चाहत्यांसाठी खास ‘झी सिनेमा’ वाहिनीवर ‘फॉरेव्हर श्रीदेवी’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सुपस्टार अमिताभ बच्चन, सलमान खान, नवाजुद्दिन सिद्दिकी, कमल हासन, जयाप्रदा आणि इतर अनेक नामवंत कलाकार श्रीदेवी यांच्या जीवनातील काही वैयक्तिक आठवणी सांगणार आहेत. तसेच शनिवार २४ मार्चला सकाळी साडे सात वाजल्यापासून श्रीदेवी यांच्या इंग्लिश विंग्लिश, मॉम, जुदाई आणि मिस्टर इंडिया या चित्रपटांदरम्यान प्रेक्षकांना श्रीदेवी यांच्या जीवनाची झलक पाहायला मिळणार आहे.आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत श्रीदेवी यांनी तब्बल ३०० पेक्षा अधिक चित्रपटांतून अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. २०१७च्या मधील ‘झी सिने अॅवॉर्डस’ पुरस्कार समारंभात सलमान खानने याबाबत वक्तव्य देखील केले होते. त्याने या पुरस्कार सोहळ्यात अनपेक्षितपणे हजेरी लावून श्रीदेवी यांना चकित केले होते. यावेळी सलमानने म्हटले होते की, “आमिर खान, शाहरूख खान, अक्षयकुमार आणि मी अनेक चित्रपटांतून भूमिका रंगवल्या आहेत. आमिर खान वर्षातून एखाद्याच चित्रपटात भूमिका साकारत असल्याने त्याने आतापर्यंत ५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असतील तर शाहरूखने १०० पेक्षा अधिक चित्रपटांतून भूमिका रंगविल्या आहेत. आमच्या सर्वांचे चित्रपट एकत्र केले, तरी आम्ही २५० ते २७५ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असतील. पण आमच्यात आज एक अशी व्यक्ती आहे जिने विविध भाषांमध्ये मिळून ३०० पेक्षा अधिक चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. ती कधी एक आई असते तर कधी एक नर्तकी, तर कधी लहान मूल, कधी तरी ती चार्ली चॅप्लिनही असते. त्यांनी इतक्या साऱ्या भूमिका कशा साकारल्या, हे फक्त परमेश्वरालाच ठाऊक! पण त्यांनी ही कामगिरी करून दाखविली... हे फक्त श्रीदेवीच करू शकतात. Also Read : ताप असूनही श्रीदेवी यांनी केले होते ना जाने कहा से आयी है या गाण्याचे चित्रीकरण