Join us

दुसऱ्यांदा डॅडी बनला फरदीन खान..पत्नी नताशाने दिला गोंडस बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 12:05 IST

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र तरीही त्याचे बॉलिवूडमध्ये आजही फॅन्स आहेत. फरदीनच्या फॅन्ससाठी आमच्याकडे ...

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र तरीही त्याचे बॉलिवूडमध्ये आजही फॅन्स आहेत. फरदीनच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूषखबर आहे. फरदीन दुसऱ्यांदा पिता बनला आहे. त्याची पत्नी नताशा हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. फरदीन आणि नाताशाची पहिली 3 वर्षांची मुलगी आहे. दुसऱ्यांदा फरदीन आणि नताशा माता-पिता बनले आहेत. या गोड बातमीमुळे सध्या दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून फरदीनची पत्नी नताशा आपल्या कुटुंबीयासोबत लंडनमध्ये राहते आहे. या दोघांनी आधीपासून निर्णय घेतला होता नताशा बाळाला जन्म लंडनमध्ये देणार होती. फरदीन खानने आपल्या फॅन्ससोबत ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. ट्वीट करत फरदीनने बाळाची जन्म तारीख आणि नाव सांगितले आहे.  11 ऑगस्ट 2017ला फरदीनला पुत्ररत्न झाला आहे. मुलाचे नाव अजरीउस फरदीन खान ठेवण्यात आल्याचे फरदीनने ट्वीटवरुन सांगितले आहे.   फरदीनने अभिनेत्री मुमताज यांची कन्या नताशा हिच्यासोबत 2005मध्ये प्रेमविवाह केला आहे.12 वर्षांपूर्वी मुंबईत शाही थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नात बॉलिवूडमधली अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. फरदीन आणि नताशाच्या तीन वर्षांच्या मुलीचे नाव डियानी इसाबेल खान आहे. फरदीन गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. फरदीनने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटात कामदेखील केले आहे मात्र एक दिवस अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झाला. 2010मध्ये आलेल्या दूल्हा मिल गया हा चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. यात त्याच्या सोबत शाहरुख खान आणि सुश्मिता सेनदेखील होती.