Join us  

मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकर, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 1:14 PM

फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर सध्या मालदीवमध्ये आहेत.

सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे पर्यटनस्थळांवरील फोटो शेअर करत असतात. त्यातही कोरोनामुळे सारेच घरात बंदिस्त झाले होते. हळुहळु सर्वच पूर्वपदावर येत आहे. त्यामुळेच कामाला सुरूवात करण्यापूर्वी रिफ्रेश व्हायचे  फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर यांनी ठरवले आहे. म्हणूनच की काय ती सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय.

फरहान आणि शिवानी दोघांनीही इन्स्टाग्रामवर समुद्राच्या किनाऱ्यावरील आपले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरुन असा अंदाज येतोय की दोघे खूप मजा  करत आहेत. शिवानीने तिच्या इन्स्टाग्रामवर फरहानबरोबर एक फोटो शेअर केला आहे. एका फोटोमध्ये असे दिसून आले आहे की, फरहान आणि शिवानी समुद्र दरम्यान समुद्रकिनार्‍याजवळील एका पूलमध्ये टाईम स्पेंड करतोय. त्याच्या चाहत्यांना हे रोमँटिक फोटो पसंतीस उतरलेत.

मालदीवमध्ये शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरसमवेत फरहानची मुलगी अकीरा अख्तरही आहे. फरहानने नुकताच इन्स्टाग्रामवर अकिराचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये अकिरा स्कुबा डायव्हिंग करीत होती. आता शिवानी आणि फरहानच्या मालदीवचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

फरहानच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो तर तो प्रियांका चोप्रासमवेत अभिनेता शेवटच्या काळात ‘द स्काई इज पिंक’ या चित्रपटात दिसला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारसे कामगिरी केली नाही. आगामी प्रोजेक्टबद्दल बोलताना दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहराच्या 'तूफान' चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :फरहान अख्तरशिबानी दांडेकर