Join us  

मलायका अरोराचे फोटो पाहून फराह खानला वाटला हेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 10:35 AM

मलायका अरोरा बॉलिवूडची सर्वात हॉट मम्मी आहे, यात शंका नाही. इतक्या वर्षांत मलायकाने ज्या पद्धतीने स्वत:ला मेंटेन केले आहे, ते कौतुकास्पद आहे. अर्थात काही दिवसांपासूनमलायका आपल्या सोशल मीडियावर जे काही करतेय, त्याने बॉलिवूडच्या अनेक मम्मीज्ला मलायकाचा हेवा वाटू लागला आहे.

ठळक मुद्देफराहच्या कमेंट जरा काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला आणखी एक गोष्ट कळेल. ती म्हणजे, मलायका मालदीव व्हॅकेशनवर एकटी गेली नव्हती. तर आणखी एक खास व्यक्ती तिच्यासोबत होती.

मलायका अरोरा बॉलिवूडची सर्वात हॉट मम्मी आहे, यात शंका नाही. इतक्या वर्षांत मलायकाने ज्या पद्धतीने स्वत:ला मेंटेन केले आहे, ते कौतुकास्पद आहे. अर्थात काही दिवसांपासूनमलायका आपल्या सोशल मीडियावर जे काही करतेय, त्याने बॉलिवूडच्या अनेक मम्मीज्ला मलायकाचा हेवा वाटू लागला आहे. तुम्हाला गंमत वाटेल, पण हे खरे आहे.अलीकडे मलायकाने आपल्या सोशल अकाऊंटवर स्वत:चे काही बिकिनी फोटो शेअर केलेत. मालदीव व्हॅकेशनदरम्यानचे हे फोटो आहेत. मलायकाच्या या प्रत्येक फोटोवर बॉलिवूडची कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान कमेंट करताना दिसतेय. मलायकाचा एक फोटो पाहून ‘ कमीनी, ये तस्वीरें कौन खींच रहा है?’, असे फराहने लिहिले. दुसऱ्या एका फोटोवर कमेंट करताना ‘कमीनी’ असे फराहने लिहिले.

फराहच्या या कमेंट पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे, कदाचित ती मलायकाचा हॉटनेट सहन करू शकत नाहीये आणि ते साहजिकही आहे. इतक्या हॉट बालेचा हेवा कुणाला वाटणार नाही?

फराहच्या कमेंट जरा काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला आणखी एक गोष्ट कळेल. ती म्हणजे, मलायका मालदीव व्हॅकेशनवर एकटी गेली नव्हती. तर आणखी एक खास व्यक्ती तिच्यासोबत होती, हेही ‘इशारों इशारों में’ फराहने सांगितले आहे. आता ही खास व्यक्ती कोण, हे वेगळे सांगायची गरज नाहीच. होय, अर्जुन कपूर. मलायका अर्जुन कपूरसोबत मालदीव व्हॅकेशनवर गेली होती, हे स्पष्ट झाले आहे. आधी मलायका मालदीवला पोहोचली होती आणि नंतर अर्जुनने तिला ज्वॉईन केले होते.

टॅग्स :मलायका अरोराफराह खान