Join us

​‘फॅन’चे नवे मोशन पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 21:32 IST

चाहत्यांना खुश करण्यासाठी निर्मात्यांनी आणखी मोशल पोस्टर लाँच केले आहे.

शाहरुखचा आगमी चित्रपट ‘फॅन’ची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. सगळीकडे जबरा फीव्हर दिसत आहे. चाहत्यांना खुश करण्यासाठी निर्मात्यांनी आणखी मोशल पोस्टर लाँच केले आहे.शाहरुख खान डबल रोलमध्ये असलेल्या या थ्रीलर चित्रपटात तो सुपरस्टार ‘आर्यन खन्ना’ आणि त्याचा डाय हार्ड फॅन ‘गौरव’ अशा भूमिका साकारत आहे.कुठल्याही परिस्थितीत आपल्या आवडत्या सुपस्टारला भेटायचेच या उद्देशाने झपाटलेला ‘गौरव’ नंतर कशा प्रकारे स्टारलाच आपल्या मागे फिरायला भाग पाडतो हे पाहणे खरेच रंजक ठरेल.15 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे ‘बँड बाजा बारात’ फेम मनीष शर्माने दिग्दर्शन केले आहे.