Join us  

अनुष्का शर्माच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, अभिनेत्रीने सुरूवात केली शूटिंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:43 PM

अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच मुंबईत परतली आहे

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच मुंबईत परतली आहे आणि आता ती पूर्ण उत्साहाने शूटिंग सेटवर परतली आहे. अनुष्का मागील आठवड्यात भारतात परतली आहे आणि प्रोफेशनल कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी तिने शूटिंगला सुरूवात केली आहे. शूटिंग सेटवरील अनुष्का शर्माचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात ती खूप फ्रेश दिसते आहे आणि आई बनल्यानंतर आता स्लिम ट्रिम अंदाजात दिसते आहे. तिची हेअर स्टाइल बदलली आहे. तिचा हा नवा लूक तिला खूप चांगला वाटतो आहे. 

तीन महिने लंडनमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा मुलगी वामिकासोबत भारतात परतली आहे. अनुष्का शर्मा नवरा विराट कोहलीसोबत दुबई क्रिकेट टुर्नामेंटदरम्यान त्याच्यासोबत राहिली होती. त्यानंतर तिला सोमवारी शूटिंगला जाताना स्पॉट केले होते. ती रविवारी ब्रॅण्ड शूटसाठी गेली होती, तेव्हा पापाराझीने तिला तिच्या कारमधून उतरताना स्पॉट केले होते. सोमवारी पुन्हा अनुष्का शूटिंगसाठी गेली तेव्हा देखील पापाराझींनी तिला गाठले. यावेळी तिने काळ्या रंगाच्या स्वेटशर्टमध्ये कॅज्युअल लूकमध्ये पहायला मिळाली.

अनुष्का शर्मा शेवटची शाहरूख खान आणि कतरिना कैफसोबत झिरो चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तिने पाताल लोक आणि बुलबुलची निर्मिती केली होती. तिच्या प्रोडक्शनचा चित्रपट काला लवकरच भेटीला येणार आहे. त्यातून इरफान खानचा मुलगा बाबिल अभिनय क्षेत्रात पदार्पण करतो आहे.

आता असे सांगितले जात आहे की ती जाहिरात आणि अँडॉर्समेंटचे काम करते आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात अनुष्का शर्माने मुलगी वामिकाला जन्म दिला आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली