Join us  

अंकिता लोखंडेचा प्रश्न ऐकून हैराण झाले चाहते, म्हणाली - 'कन्फ्यूजन दूर करा'

By तेजल गावडे | Published: November 11, 2020 1:12 PM

अंकिता लोखंडेने फोटो शेअर करत चाहत्यांना विचारला प्रश्न, काहींनी दिले उत्तर तर काही झाले हैराण

कोरोना लॉकडाउनपासून अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट चाहत्यांपर्यंत पोहचवते आहे. ती प्रत्येक छोटी-छोटी गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच आपल्या केसांसोबत खेळताना अंकिताने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने आपल्या चाहत्यांना असे काहीतरी विचारले जे ऐकून काही लोक हैराण झाले. शेअर केलेल्या फोटोत ती गुलाबी रंगाच्या टीशर्टमध्ये दिसते आहे. तिने केस मोकळे ठेवले आहेत आणि तिने केसांसोबत खेळतानाचे पोज देत फोटो शेअर केले आहेत.फोटो शेअर करत अंकिताने लिहिले की, छोटो केस की मोठे केस? यासोबतच तिने कॅप्शनमध्ये सांगितले की ती खूप कन्फ्यूज आहे.

फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला सल्ला दिला की केस छोटे करू नका. चाहत्यांचे म्हणणे आहे की तिला लांब केस चांगले वाटतात. तर काही लोकांनी तिला एकदा लूकसोबत एक्सपेरिंमेंट करून पहायला सांगितले.

मागील आठवड्यात अंकिताने फियॉन्से विक्की जैनसाठी करवा चौथचा व्रत ठेवले होते. तिने लाल रंगाच्या साडीतील बरेच फोटो शेअर केले होते. नुकतेच अंकिताने सोशल मीडियावर विकी जैनची माफी मागितली होती.

या पोस्टमध्ये अंकिता लोखंडेने लिहिले की, तुझ्यासाठी माझ्या असलेल्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. जेव्हा मी आपल्या दोघांना एकत्र पाहते तेव्हा माझ्या डोक्यात सर्वात आधी एकच गोष्ट येते की माझ्या जीवनात एक मित्र, पार्टनर आणि सोलमेटसारखा व्यक्ती पाठवल्यामुळे मी देवाची आभारी आहे. माझ्या प्रत्येक अडचणीत साथ दिल्याबद्दल आभारी आहे. माझी प्रत्येक अडचण स्वतःची समजून माझी मदत केल्यामुळे मी आभारी आहे. माझा सपोर्ट सिस्टम बनण्यासाठी मी आभारी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आणि माझी परिस्थिती समजून घेतली त्यासाठी आभारी आहे.

पुढे अंकिताने विक्की जैनची माफी मागत म्हटले की, माझ्यामुळे तुला टीका सहन करावी लागली त्यासाठी मला माफ कर. शब्द कमी पडतील पण आपले बॉण्डिंग खूप छान आहे. आय लव्ह यू.

टॅग्स :अंकिता लोखंडे