Join us  

मनोज वाजपेयीच्या खऱ्या आयुष्यातील चेल्लम सर कोण?  तुम्हाला ठाऊक आहे का उत्तर?  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 10:30 AM

The Family Man 2 : श्रीकांतच्या मदतीला सतत तत्पर असलेल्या चेल्लम सरांवरचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ही झाली वेबसीरिजची गोष्ट. पण श्रीकांत म्हणजे मनोज वाजपेयीच्या ख-या आयुष्यातील चेल्लम सर कोण?

ठळक मुद्दे ‘द फॅमिली मॅन 2’  सीरिजमध्ये श्रीकांत तिवारीच्या मित्राचे (मदतनीस) नाव चेल्लम सर असे आहे. तो एक निवृत्त झालेला डिटेक्टिव्ह आहे.

‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) या वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे आणि या वेबसीरिजला मिळालेल्या यशामुळे मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee)  सध्या जाम खूश आहे.  ‘द फॅमिली मॅन 2’ रिलीज झाली आणि या वेबसीरिजवर चाहत्यांच्या उड्या पडल्यात. अगदी ओटीटीपासून सोशल मीडियापर्यंत याच वेबसीरिजच्या चर्चा रंगल्या. वेबसीरिजमध्ये मनोज वाजपेयीने साकारलेल्या श्रीकांत या भूमिकेचे कौतुक झालेच. पण त्याशिवाय सामंथा अक्कीनेनीने साकारलेली राजी आणि अभिनेता उदय महेशने साकारलेले चेल्लम सर (Chellam Sir) हे पात्रही जबरदस्त लोकप्रिय झाले.

चेल्लम सरांचे तर विचारू नका. श्रीकांतच्या मदतीला सतत तत्पर असलेल्या या चेल्लम सरांवरचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ही झाली वेबसीरिजची गोष्ट. पण श्रीकांत म्हणजे मनोज वाजपेयीच्या ख-या आयुष्यातील चेल्लम सर कोण? हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर आता त्याचाही खुलासा झाला आहे. ( chellam in family man 2)

 स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत खुद्द मनोजने या प्रश्नाचे उत्तर दिले.  माझ्या आयुष्यात असे अनेक चेल्लम सर आहेत. ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. नीरज पांडे, अभिषेक चौबे, राज, डीके, अनुराग कश्यप हे असे लोक आहेत जे कायम माज्या मदतीला सतत तत्पर असतात. अगदी अर्ध्या रात्री कधीही फोन करुन मी त्यांच्याकडे मदत मागू शकतो. हे माझ्या आयुष्यातील खरे चेल्लम सर आहेत, असे मनोज वाजपेयीने सांगितले. ‘द फॅमिली मॅन 2’चे दिग्दर्शक सुपर्ण वर्मा हेही आता माझे चेल्लम सर आहेत. कारण त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे, प्रत्येक समस्येवरचे उत्तर असते, असेही मनोज वाजपेयीने सांगितले. ‘द फॅमिली मॅन 2’  सीरिजमध्ये श्रीकांत तिवारीच्या मित्राचे (मदतनीस) नाव चेल्लम सर असे आहे. तो एक निवृत्त झालेला डिटेक्टिव्ह आहे. जेव्हा कधी श्रीकांतला मदतीची गरज भासते तेव्हा तो कायम धावून येतो. त्याला त्यांच्या कामात मार्गदर्शन करतो. सीरिजमध्ये चेल्लम सर हे पात्र फार कमी वेळासाठी दिसते. पण तरिही या पात्राला चाहत्यांची जोरदार पसंती लाभली.

टॅग्स :मनोज वाजपेयी