Join us  

कुटुंबाकडे उपचारासाठीदेखील नव्हते पैसे, सरकारी रुग्णालयात कॉमेडीयन वाडिवेल बालाजीचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 1:22 PM

कॉमेडियन वाडिवेल बालाजीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

कॉमेडियन वाडिवेल बालाजीचे गुरूवारी निधन झाले. वयाच्या ४५ व्या वर्षाच्या वाडिवेल बालाजीच्या निधनामुळे तमीळ सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. बालाजीने आधु इधु इधु आणि कालाकापोवाथु यारु यासारख्या मालिकेत काम केले होते. 

वाडिवेल बालाजीला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याच्या कुटुंबाकडे त्याच्या उपचारासाठी पैसे नव्हते.त्यामुळे कालांतराने त्याला एका सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बालाजी पॅरालाइज झाला होता.

मागील पंधरा दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते आणि गुरूवारी सकाळी तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्याचे निधन झाले. असेही वृत्त आले होते की लॉकडाउनमध्ये बालाजीची आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

टेलिव्हिजन व्यतिरिक्त वाडिवेलने काही तमीळ सिनेमातही काम केले होते. त्याला पॉप्युलर कॉमेडियन वाडिवेलूची मिमिक्री आणि त्याच्यासारखे दिसत असल्यामुळे लोकप्रियता मिळाली होती. या कारणामुळे त्याचे चाहते वाडिवेल संबोधत होते.

एका शोमध्ये वाडिवेल म्हणाला होता की, त्याच्यावर बालाजीची कृपा आहे त्यामुळे तो वाडिवेलूची इतकी चांगली मिमिक्री करू शकतो.