Join us

Exclusive : ​'या' हॉलिवूडपटांनी बॉलिवूड चित्रपटांवर केली मात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 13:44 IST

-रवींद्र मोरे गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूड इंडस्ट्री बॉलिवूडवर वरचढ करताना दिसत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अलिकडेच रिलीज झालेला ...

-रवींद्र मोरे गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूड इंडस्ट्री बॉलिवूडवर वरचढ करताना दिसत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अलिकडेच रिलीज झालेला हॉलिवूड चित्रपट 'ब्लॅक पॅँथर' चित्रपट होय. हा चित्रपट भारतात एक हजार स्क्रीनवर रिलीज होऊन सुमारे १९.३५ करोड एवढी बक्कळ कमाई केली, मात्र त्याच्या तुलनेने  १७५० स्क्रीन्सवर रिलीज होऊन 'अय्यारी'ने आतापर्यंत सुमारे ११.७० करोड रुपयांची कमाई केली. या अगोदरही हॉलिवूडपटांनी बॉलिवूड चित्रपटांवर मात केलेली दिसून आली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...* जस्टिस लीग - तुम्हारी सुलूहॉलिवूड चित्रपट 'जस्टिस लीग' आणि विद्या बालनचा बॉलिवूड चित्रपट 'तुम्हारी सुलू' १७ नोव्हेंबर, २०१७ रोजी सोबतच भारतीय बॉक्स आॅफिसवर रिलीज झाले होते. जस्टिस लीगने भारतीय बॉक्स आॅफिसवर ४१.१ करोड रुपयांचे कलेक्शन केले, मात्र तुम्हारी सुलू फक्त ३६ करोड एवढेच कलेक्शन करु शकला.  * थॉर - इत्तेफाकहॉलिवूड चित्रपट 'थॉर' आणि बॉलिवूड 'इत्तेफाक' सोबतच ३ नोव्हेंबर २०१७ रोजी भारतीय बॉक्स आॅफिसवर रिलीज झाले होते. विशेष म्हणजे दोन्हीही दमदार चित्रपट होते, मात्र कमाईच्या बाबतीत थॉर इत्तेफाकवर वरचढ ठरला. थॉरने सुमारे ५८ करोड कमाई केली होती तर इत्तेफाक फक्त ३० करोड एवढीच कमाई करु शकला.  * कॅप्टन अमेरिका : सिविल वार - 1920 लंडनहॉॅलिवूड चित्रपट कॅप्टन अमेरिका : सिविल वार आणि हॉरर बॉलिवूड चित्रपट ‘1920 लंडन’ सोबतच ६ मे २०१६ रोजी भारतीय बॉक्स आॅफिसवर रिलीज झाले होते. कॅप्टन अमेरिका.....ने त्यावेळी भारतीय बॉक्स आॅफिसवर ५९.९ करोड रुपयांचे कलेक्शन केले होते, मात्र 1920 लंडन फक्त १५.४ करोड एवढीच कमाई करु शकला.   * बॅटमॅन वर्सेज सुपरमॅन - रॉकी हॅँडसमहॉलिवूड चित्रपट 'बॅटमॅन वर्सेज सुपरमॅन' आणि जॉन अब्राहमचा बॉलिवूड चित्रपट 'रॉकी हॅँडसम' सोबतच २५ मार्च २०१६ रोजी भारतीय बॉक्स आॅफिसवर रिलीज झाला होता. बॅटमॅन....ने त्यावेळी सुमारे ३८.५ करोड एवढी कमाई केली होती, मात्र रॉकी हॅँडसम २५.१ करोड एवढीच कमाई करु शकला.  * लोगन आणि कमांडो 2 हॉलिवूड चित्रपट 'लोगन' आणि बॉलिवूडचा दमदार 'कमांडो 2' हे सोबतच ३ मार्च २०१७ रोजी रिलीज झाले होते. लोगनने बॉक्स आॅफिसवर सुमारे ३५.३ करोड कमाई केली तर कमांडो 2 ने फक्त २५.२ करोड एवढीच कमाई केली.