अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) लवकरच संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिने मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारली आहे. खरेतर या चित्रपटाआधी संजय लीला भन्साळी यांच्यासोबत आलिया भट 'इंशाल्लाह' चित्रपटात काम करणार होती. मात्र हा चित्रपट बनण्याआधीच रखडला. तसेच संजय लीला भन्साळी 'बालिका वधू' हा चित्रपट बनवणार होते आणि या चित्रपटासाठी त्यांनी आलियाची निवड केली होती. पण हा चित्रपटदेखील बस्त्यात गेला. याबद्दल नुकताच आलिया भटने मुलाखतीत खुलासा केला.
आलिया भटने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी वयाच्या ९व्या वर्षापासून मला संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. आम्ही एका चित्रपटावर कामदेखील करत होतो. संजय सर त्यावेळी एक चित्रपट बनवत होते बालिका वधू. मात्र हा सिनेमा बनला नाही. हा चित्रपट बनता बनता राहिला.
आलिया पुढे म्हणाली की, त्यानंतर मी आणि संजय सर इंशाल्लाह चित्रपटासाठी भेटलो आणि हा चित्रपटदेखील बस्त्यात गेला. हा चित्रपट पण होता होता राहिला. मग माझ्या मनात शंका निर्माण होऊ लागली की, माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे का? माझ्या ग्रहांमध्ये काही अडचण आहे का? काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे.