Join us

Exclusive! श्रेया घोषाल लवकरच देणार गूड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 17:57 IST

श्रेया घोषाल गरोदर असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. पण तिने या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. ...

श्रेया घोषाल गरोदर असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. पण तिने या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. तिच्या फॅन्सने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असेदेखील तिने तिच्या फॅन्सना सांगितले होते. पण श्रेयाच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. श्रेया गरोदर असून लवकरच ती बाळाला जन्म देणार आहे.खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेया लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या तिने काही दिवस तरी गायनातून ब्रेक घेतला आहे. श्रेया ही आजच्या घडीची सर्वात प्रसिद्ध गायिका मानली जाते. केवळ बॉलिवूडच नव्हे तर अनेक मराठी चित्रपटांमध्येदेखील तिने एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत. खुलता कळी खुलेना या मराठी मालिकेचे शीर्षकगीत तिनेच गायलेले आहे. हे शीर्षकगीत सध्या चांगलेच गाजत आहे.श्रेयाने आपल्या चित्रपटात एखादे तरी गाणे गावे किंवा आपल्या मालिकेचे शीर्षकगीत तिने गावे अशी सध्या अनेक निर्मात्यांची इच्छा आहे. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी तिला गेल्या काही दिवसांमध्ये गाण्यासाठी विचारले आहे. पण ती आई होणार असल्याने तिने अनेक ऑफर्स नाकारल्या असल्याची चर्चा आहे. सध्या तरी ती तिच्या तब्येतीकडे लक्ष देणार असल्याचे कळतेय. श्रेयाने संजय लीला भन्सालीच्या देवदास या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये आगमन केले. तिने गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कार मिऴवले आहेत. श्रेया 2015 मध्ये शैलदित्य मुखोपाध्यायसोबत लग्नबंधनात अडकली. श्रेयाकडून तिच्या गरोदरपणाच्या बातमीला दुजोरा मिळाला नसला तरी तिने स्वतः ही गोड बातमी तिच्या फॅन्सना देण्याची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.