Join us

Exclusive ​ऐ ‘फिल्म’ है मुश्किल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 16:30 IST

पाकिस्तान आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात देशभरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाला देशभरातून विरोध ...

पाकिस्तान आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात देशभरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाला देशभरातून विरोध होतो आहे.  सिनेमात फवाद खान हा पाकिस्तानी कलाकार असल्याने या सिनेमावर बंदी घालावी किंवा रिलीज होऊ देऊ नये अशी मागणी होते आहे. आता याच वादाच्या पार्श्वभूमीवर करण जोहरने त्याच्या आणखी एका आगामी सिनेमातून पाकिस्तानी कलाकाराला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. दूधानं तोंड भाजलेला ताकही फुंकून पितो या उक्तीनुसार 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाच्या वादानंतर करणने आगामी 'डिअर जिंदगी' या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेता अली जफरला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. गौरी शिंदे दिग्दर्शित आणि धर्मा प्रॉडक्शन्स निर्मित या सिनेमात अली जफरसह किंग खान शाहरुख आणि आलिया भट्ट यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आता अली जफरला या सिनेमातून काढल्यानंतर त्याची जागा कोण घेणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. करण सध्या अलीच्या जागी कोणाला घ्यायचे याची चाचपणी करतो आहे. मात्र यामुळे करण आणि धर्मा प्रॉडक्शन्सच्या  डिअर जिंदगीवर आणि बद्रिनाथ की दुल्हनियाँ  या दोन्ही सिनेमांना फटका बसला आहे. डिअर जिंदगीवर करणचे सध्या सारे लक्ष केंद्रित झाले आहे. त्यामुळे वरुण धवन आणि आलिया भट्ट स्टारर 'बद्रिनाथ की दुल्हनियाँ' या सिनेमाच्या शुटिंगवर परिणाम झाला आहे. या सिनेमाचे शुटिंग सिंगापूरमध्ये होणार होते. मात्र आता करणने हे शुटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे करण आणि धर्मा प्रॉडक्शन्सला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.