Join us

.... तेव्हाही होती पीसी खुप नर्व्हस..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 10:24 IST

पिगी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्राने अभिनयाचे कौटुंबिक वातावरण नसताना बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. हळूहळू चित्रपट साकारत तिने एक अपेक्षित उंची गाठली आहे.

पिगी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्राने अभिनयाचे कौटुंबिक वातावरण नसताना बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. हळूहळू चित्रपट साकारत तिने एक अपेक्षित उंची गाठली आहे. बॉलीवूडमधील इतर जोड्यांप्रमाणे कुठल्याही वादात आणि रिलेशनशिपमध्ये ती अडकली नाही. अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ मध्ये एन्ट्री केल्यानंतर तिच्या करिअरला लिफ्टच मिळाली.पण, ती सांगते की, बॉलीवूडच्या मानसिकतेतून एकदम हॉलीवूडमध्ये जाणे हे ठरवणेही खुप कठीण होतं. ती म्हणते,‘ क्वांटिकोमधील माझ्या पात्रासाठी जेव्हा आॅडिशन ठेवण्यात आले होते तेव्हा मी आॅडिशनसाठी खुप नर्व्हस होते. बॉलीवूडमध्ये ५० चित्रपट केले तरी एवढी नर्व्हसनेस नव्हती जेवढी क्वांटिकोच्या आॅडिशनला होती.मी भारतीय म्हणून माझी जबाबदारी साहजिकच वाढली होती. त्यामुळे तो मुद्दा माझ्या आत्मसन्मानाचा विषय बनला होता. मला आॅडिशन म्हणजे काय हे नक्कीच चांगले माहित होते. पण, मला असे वाटत होते की, प्रथमच आॅडिशन देते आहे. ’ तिच्या आॅडिशनअगोदरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.">http://