Join us  

'देसी गर्ल' प्रियांकाला साडीत पाहून निक जोनसही झाला फिदा; म्हणाला - 'जस्ट लुकिंग लाईक अ Wow!'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 12:51 PM

नुकतेच निक जोनासने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पत्नी प्रियांका चोप्राचा साडीतील फोटो पोस्ट केला.

केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधील एक क्युट कपल म्हणून निक जोनस आणि प्रियांका चोप्राकडे पाहिले जाते. निक आणि प्रियांकाची लव्ह स्टोरी कोणत्याही फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नाही.  रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केलं आणि आता दोघे सुखाने संसार देखील करत आहेत. तसे तर दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहेच. पण निकचे प्रेम काहीसे जास्तच आहे आणि ते नेहमी दिसून येते.  ज्या पद्धतीने निक प्रियांकाचे फोटो शेअर करतो त्यातूनच ही गोष्ट दिसून येते. नुकतेच निक जोनासने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पत्नी प्रियांका चोप्राचा साडीतील फोटो पोस्ट केला. प्रियांकाच्या साडीच्या लूकवर निकही फिदा झाला.  या फोटोसह त्याने सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला 'जस्ट लुकिंग लाईक अ वॉव' हा डायलॉगही कॅप्शनमध्ये लिहला.  प्रियंका आणि निकने १ डिसेंबर, २०१८ रोजी दोघांनी जयपूरमध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला ५ वर्ष झाली असून आता त्यांना मालती मेरी नावाची गोड मुलगीही आहे.

प्रियांका चोप्रा ही एक ग्लोबल स्टार आहे. पती निक जोनससोबत परदेशात राहणारी प्रियांका तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समुळे खूप कमी वेळ भारतात येते. मामी फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी नुकतेच प्रियंका मुंबईत आली होती. या टूरमध्ये तिने अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. शिवाय तिचं आवडतं ठिकाण म्हणजेच मरिन ड्राईव्हवरही ती पोहचली होती. 

गुरुवारी पहाटे प्रियांका चोप्रा .  मुंबईतील कलिना विमानतळावर स्पॉट झाली. मुंबईवरुन ती पुन्हा अमेरिकेला परतली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मुंबईची एक झलक शेअर केली आणि लिहिले “Wil miss u mumbai. अलविदा मेरी जान.. लवकरच भेटू.”  हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून प्रियंका  क्वचितच भारतात येते. अशा परिस्थितीत चाहते त्याच्या भारतात परतण्याची आतुरतेने वाट पाहतात. 

टॅग्स :प्रियंका चोप्राप्रियांका चोप्रा आणि निक जोनासनिक जोनाससेलिब्रिटी