Join us  

अरे यांच चाललंय तरी काय, घटस्फोटानंतरही एकत्र पाहून चाहते पडले बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:18 AM

आमिर खान आणि किरण राव या दोघांनी ३ जुलै रोजी त्यांचा घटस्फोट झाल्याचे जाहीर केले होते. या दोघांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आल्याचे कळताच चाहत्यांनाही प्रचंड धक्का बसला होता.

आमिर खान आणि किरण राव या दोघांनी ३ जुलै रोजी त्यांचा घटस्फोट झाल्याचे जाहीर केले होते. या दोघांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आल्याचे कळताच चाहत्यांनाही प्रचंड धक्का बसला होता. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले होते. इतकेच काय तर आमिर आणि किरण दोघांनी लाईव्ह येत चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देत दोघेही त्यांच्या निर्णयाने खुश असल्याचे सांगितले होते.

आता पुन्हा आमिर आणि किरण या दोघांचा एका फोटोने चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत.  एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात दोघांना आमंत्रण देण्यात आले होते. घटस्फोटानंतरही दोघांमध्ये आजही चांगली मैत्री आहे. त्यामुळे लग्नाला दोघेही एकत्र हजेरी लावणार हे अपेक्षित होते. दोघांनाही एकत्र पाहाताच मीडियाच्या कॅमे-यांनी त्यांना एकत्र टिपले. आमिर आणि किरण यांना एकत्र पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले असले तरी यात काही नवीन नाही.

 

कारण घटस्फोटाच्या अवघ्या काही दिवसांतच दोघे पुन्हा एकत्र दिसले होते.आमिर आणि किरणचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.दोघांमध्ये आजही पूर्वीसारखीच केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळतंय.आमिर आणि किरण या दोघांच्या मैत्रीवर त्यांच्या घटस्फोटाचा काहीही फरक पडला नसल्याचे यातून स्पष्ट होते. इतकेच काय तर त्यांच्या त्यांची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफहीमध्ये उत्तम बॅलेंन्स केला असल्याचे पाहायला मिळत आहे.

२००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं होतं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. देशभरात दोघेही पाणी फाऊंडेशनसाठी काम करतात.

टॅग्स :आमिर खानकिरण राव