Join us  

ईशा गुप्ताने पुन्हा शेअर केला हॉट फोटो, मिनिटात झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 4:28 PM

योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा इशाचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेत्री इशा गुप्ताने स्वत:चा  एक हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या मोनोक्रोम फोटोत, ईशा बेडवर पोज देताना दिसत आहे. यावेळी इशाने स्मोकी आय मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.२०२० वर्षाला गुड बाय करतानाही तिने असाच टॉपलेस फोटो टाकत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिच्या या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे ईशा गुप्ता अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होत असते.

नेहमीच इशा ट्रोलर्सना उत्तर देत त्यांची बोलतीही बंद करताना दिसते. 2020 मध्ये शेवटचा फोटो शेअर करताना खोचक अशी कॅप्शनही दिली होती. त्यावेळी तिने म्हटले होते की,  लोक नकारात्मक आणि ट्रोलिंग करण्यात व्यस्त आहेत.

 

कधीकधी मला या गोष्टींबद्दल वाईट वाटते की कदाचित ते किती नकारात्मक दृष्टीकोण बाळगत असतात. कदाचित त्यांना मन मोकळे करण्यासाठी त्यांच्या जवळ तशी व्यक्ती नाही म्हणूनच ते इतरांना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाही.

सिनेमांपेक्षा ईशा तिच्या हॉट फोटोंमुळेच चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी 'रिजेक्टएक्स2' या वेब सिरीजमध्ये एका पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसली होती. हॉटनेसबरोबरच ईशा तिच्या फिटनेसबाबतही खूप सजग असते. ती फिटनेसफ्रिक अभिनेत्री आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते.

योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा इशाचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत तिचे खाली डोकं वर पाय केलेत. याचाच अर्थ ती शीर्षासन करत असतानाचा पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोला बरेच लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. 

ईशा गुप्ताने २००७ मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता आणि यात ती तिसऱ्या स्थानावर होती. तिने मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब आपल्या नावावर केला होता. त्यानंतर २०१० मध्ये ईशा गुप्ता फार बोल्ड फोटोंसोबत किंगफिशरच्या कॅलेंडरवर झळकली होती आणि येथूनच ती पुढे बॉलिवूडमध्ये आली.

टॅग्स :ईशा गुप्ता