Join us

Esha Deol : ईशा देओल आणि भरत तख्तानीचा झाला घटस्फोट, १२ वर्षांचा संसार अखेर मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 7:12 PM

Esha Deol and Bharat Takhtani divorced : ईशा देओल आणि भरत तख्तानी वेगळे झाले आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशीपच्या बातम्या येत होत्या. नुकतेच या जोडप्याने एक निवेदन दिले आणि वेगळे झाल्याची माहिती दिली.

ईशा देओल (Esha Deol) ही सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशाने २००२ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले, तरी ती तिच्या आई-वडील किंवा भावांप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे नाव कमवू शकली नाही. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर तिने २९ जून २०१२ रोजी बिझनेसमन भरत तख्तानी(Bharat Takhtani)सोबत लग्न केले. आता वृत्त समोर येत आहे की त्यांच्या लग्नाच्या १२ वर्षानंतर ईशा आणि भरतने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली टाइम्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की या जोडप्याने संयुक्त निवेदन जारी केले आहे. यात ते म्हणाले, 'आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील या बदलानंतर आमच्या दोन्ही मुलांचे कल्याण सर्वात महत्वाचे राहील.

अशी झाली होती ईशा आणि भरतची पहिली भेट

भरत आणि ईशाची भेट एका शालेय स्पर्धेदरम्यान झाली होती. एका मुलाखतीत तिच्या प्रेमकथेबद्दल सांगताना ईशा म्हणाली होती, "मी जमनाबाई नरसी स्कूलमध्ये होते आणि भरत बांद्रा येथील लर्नर्स अॅकाडमीमध्ये शिकत होता. लर्नर्स अकॅडमीत सर्व देखणी मुले आहेत. कॅस्केड आंतरशालेय स्पर्धेत आम्ही दोघे भेटलो. ही स्पर्धा माझ्या शाळेने आयोजित केली होती. 

रिलेशनशीप, ब्रेकअप, पुन्हा अफेयर आणि मग लग्न

अभिनेत्रीने सांगितले होते की तिने तिचा फोन नंबर टिश्यूवर लिहून त्याला दिला होता. त्यावेळी बोलणे खूप अवघड होते. ईशा म्हणाली, आम्ही कॉलेजच्या काळात संपर्कात होतो. यानंतर, जेव्हा मी १८ वर्षांची झाली तेव्हा आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आले. मात्र, मध्येच आमचे ब्रेकअप झाले होते. यानंतर आम्ही १० वर्षांनी पुन्हा भेटलो आणि पुन्हा रिलेशनशिपमध्ये आलो.

वर्कफ्रंट

ईशा देओलने २००२ मध्ये 'कोई मेरे दिल से पूछे' मधून पदार्पण केले होते. यानंतर तिने धूम, 'ना तुम जानो ना हम', 'क्या दिल ने कहा', 'हायजॅक' आणि 'प्यारे मोहन' सारख्या चित्रपटात काम केले. तिने २०२२ मध्ये 'अजय देवगणच्या रुद्र: द एज ऑफ डार्कनेस'मधून ओटीटीमध्ये पदार्पण केले.

टॅग्स :इशा देओलहेमा मालिनीधमेंद्र