Join us

​ एन्जॉय : ‘जबरा फॅन...’ इन अरेबिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 19:23 IST

  ‘जबरा फॅन...’ हे गाणे अरबी भाषेत रिलिज  झाले आहे.

 किंगखान शाहरूख खान यांच्या बहुप्रतिक्षीत ‘फॅन’ या चित्रपटातील ‘जबरा फॅन...’हे गाणे अफाट लोकप्रीय झाले आहे. देशातील सात प्रादेशिक भाषांमध्ये हे गाणे रिलीज करण्याची दिग्दर्शकाची आयडिया चांगलीच कामी आले, असे म्हणायला हवे. आता इंटरनॅशनल मार्केटवर डोळा ठेवत दिग्दर्शकाने शाहरूखच्या विविध देशांतील चाहत्यांना ‘कॅश’ करण्याचा निर्णय घेतला आहे. अरब देशांमध्ये शाहरूखचे असंख्य चाहते आहेत, हेच हेरून दिग्दर्शकाने नुकतेच ‘जबरा फॅन...’ हे गाणे अरबी भाषेत रिलिज केले. ग्रिनी याने  ‘जबरा फॅन...’चे अरेबिक व्हर्जन गायले आहे. एन्जॉय करा तर...