Join us  

अखेर अपूर्ण राहिली ऋषी कपूर यांची ही इच्छा, वाचून व्हाल इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 6:00 AM

ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला आणि त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.

गुजराती चित्रपट चाल जीवी लैये जेव्हा ऋषी कपूर यांंनी पाहिला तेव्हा त्यांना तो खूप आवडला. त्यांना हा चित्रपट इतका आवडला की ते या चित्रपटाचा हिंदी रिमेक करायला तयार झाले. यात वडील-मुलाची कथा आहे. मुलगा दिवसरात्र काम करत असतो. त्याच्या वडिलांना गंभीर आजार होतो. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाप मुलगा एका यात्रेवर जातात. गुजरातीत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

ऋषी कपूर यांची इच्छा होती की, हा चित्रपट हिंदीत बनला पाहिजे. ज्यात ते स्वतः आणि मुलगा रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारतील. त्यांनी या चित्रपटासाठी रणबीरला देखील तयार केले होते.

चित्रपटाची प्रोडक्शन कंपनीचे सीईओ रितेश लालन यांच्यानुसार, लॉकडाउनच्या आधीपर्यंत ऋषी कपूर यांच्यासोबत बातचीत सुरू होती. यादरम्यान लॉकडाउन सुरू झाले आणि बातचीत थांबली. त्यानंतर ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. रणबीर कपूरसोबत याबद्दल काहीच बोलणे झाले नाही.

रितेश लालन यांच्यानुसार, खऱ्या आयुष्यातील वडील-मुलगा चित्रपटातदेखील वडील मुलाच्या भूमिकेत असले की चित्रपट थेट कनेक्ट होतो. यापूर्वी ऋषी आणि रणबीर यांनी एकत्र बेशरम चित्रपटात काम केले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता.

टॅग्स :ऋषी कपूररणबीर कपूर