Join us  

फॅनने "गर्लफ्रेंड कशी पटवायची?" विचारताच इमरान भन्नाट उत्तर देत म्हणाला, "२००४ ते २०१० पर्यंत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 4:55 PM

इमरानने फॅनला 'गर्लफ्रेंड कशी पटवायची?' यावर दिलीय खास टिप्स, तुम्हीही वाचा

इमरान हाश्मी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. करिअरच्या सुरुवातीला सिरीयल किसर अशी ओळख इमरानने मिळवली असली तरीही नंतर त्याने सिनेमांतून विविध भूमिका साकारून एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून स्वतःची छाप पाडली. इमरानने नुकतंच त्याच्या फॅन्ससोबत सोशल मीडियावर संवाद साधला. त्यावेळी इमरानच्या हजरजबाबी स्वभावाचा अनुभव सर्वांना आला.

इमरानला सोशल मीडियावर एका चाहत्याने मुलींना प्रेमात पाडण्यासाठी टिप्स देण्यास सांगितले. इंटरनेट वापरकर्त्याने लिहिले की, "भाई गर्लफ्रेंड कैसे बनते है थोड़े से टिप्स दे कृपया." इमरानने हे ट्विट लक्षात घेतले आणि तो म्हणाला, "मेरी 2004 से 2010 तक कोई भी फिल्म उठा कर देख लो. कुछ टिप्स जरूर मिल जायेंगे." अशाप्रकारे इमरानने अभिमानाने त्याच्या जुन्या सिनेमांची आठवण काढली.

इमरान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो गेल्या वर्षी सलमान खानसोबत 'टायगर 3' मध्ये झळकला. याशिवाय इमरानची वेबसिरीज 'शोटाईम' नुकतीच हॉटस्टारवर प्रदर्शित झालीय. या वेबसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे इमरान 'ए मेरे मेरे वतन' सिनेमात सारा अली खानसोबत क्रांतीकारकाच्या विशेष भूमिकेत झळकणार आहे. २१ मार्चला हा सिनेमा अेमेझॉन प्राईमववर रिलीज होईल.

 

टॅग्स :इमरान हाश्मीबॉलिवूड