Join us

एलफिन्स्टन-परळ दुर्घटनेवर बॉलिवूड स्टार्सनी व्यक्त केला संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 19:45 IST

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणाºया पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेकजण या दुर्घटनेत जखमी ...

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणाºया पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेकजण या दुर्घटनेत जखमी झाले. ही घटना सकाळी १०.४५ मिनिटांनी घडली. जेव्हा याबाबतचे वृत्त समोर आले तेव्हा सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अनेक राजकारण्यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना मृतांच्या परिवारांप्रती संवेदना व्यक्त केली. काही बॉलिवूड कलाकारांनीही मृतांच्या परिवाराप्रती सहानुभूती व्यक्त केली. तसेच गंभीर असलेल्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मात्र काहींनी संताप व्यक्त करताना हेच का स्वप्नांचे शहर? असा सवाल उपस्थित केला. }}}} ">http://अभिनेत्री डायना पेंटीने म्हटले की, ‘एक असे शहर जे चहूबाजूने पसरले आहे, अशात ही घटना घडने खूपच चुकीचे आहे. आपल्याला चांगल्या इंफ्रास्ट्रक्चरची गरज आहे. त्या लोकांसाठी मी प्रार्थना करते, जे या घटनेतील पीडित आहेत.’ डायना व्यतिरिक्त रविना टंडन, अभिषेक बच्चन, अनुपम खेर आणि शेखर कपूर यांनी त्यांच्या भावना ट्विटर हॅण्डलच्या माध्यमातून व्यक्त केल्या. रविना टंडनने लिहिले की, ‘या घटनेत बळी पडलेल्या लोकांच्या परिवारांप्रती सांत्वन व्यक्त करते. ही घटना आपल्याला थांबविता येऊ शकली असती. हे खूपच दुर्दैवी आहे.’ दिग्गज अभिनेता अनुपम खेरने लिहिले की, ‘मुंबई एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांविषयी ऐकून खूप भयभीत झालो. तसेच मनातून खूप दु:खी झालो आहे. सर्वांसाठी प्रार्थना आणि संवेदना’}}}} ">http://‘बादशाहो’ स्टार अजय देवगणने लिहिले की, ‘कृपया रक्तदान करा, जखमींना मदत करा.’ अभिषेक बच्चनने लिहिले की, ‘माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्या लोकांप्रती आहेत, ज्यांचे स्वकीय या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत.’ बोमन इराणींने लिहिले की, ‘भयभीत आणि दुर्दैवी... ही घटना टाळता येऊ शकली असती. तर शेखर कपूर यांनी याविषयी एका पाठोपाठ एक ट्विट करताना लिहिले की, ‘एक शहर ज्याठिकाणी तुम्हाला श्वासही घेता येत नाही. तुम्ही जगण्यासाठी जागा शोधू शकत नाही. तुम्ही काम करण्यासाठी जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्ही स्वत:चे आयुष्य धोक्यात टाकता. स्वप्नाचे शहर की भयभयीत करणारे स्वप्न’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. }}}} ">http://