Join us  

आठ वर्षांनी बॉलिवूडमध्ये कॅमबक करु शकते सुश्मिता सेना मात्र या अटीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 6:15 AM

गेल्या काही दिवसांपासून सुश्मिता सेन आपला ब्रॉयफ्रेंड रितिक भसीनला घेऊन चर्चेत आहे. सुश्मिताचे नाव बॉलिवूडला काही अशा अभिनेत्रींमध्ये सामील ...

गेल्या काही दिवसांपासून सुश्मिता सेन आपला ब्रॉयफ्रेंड रितिक भसीनला घेऊन चर्चेत आहे. सुश्मिताचे नाव बॉलिवूडला काही अशा अभिनेत्रींमध्ये सामील आहे ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. आजही तिचे करोडो फॅन्स आहेत. सुश्मिताच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे. लवकरच ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करु शकतो. मात्र यासाठी सुश्मिताने एक अट ठेवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुश्मिता मोठ्या पडद्यापासून दूर आहे. २०१० मध्ये ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. तेव्हापासून ती मोठ्या पडद्यावरून गायब आहे. अर्थात सोशल मीडियावर ती तेवढीच अ‍ॅक्टिव्ह असते. जीममधले फोटो ती नेहमीच पोस्ट करत असते आणि तिचे फोटो व्हायरल व्हायला वेळ ही लागत नाही.  काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर ती चित्रपटापासून लांब जाणेच पसंत केले. नुकताच या इव्हेंट दरम्यान सुश्मिताने एक खुलासा केला की, सध्या ती काही चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स वाचते आहे. लवकरच ती चित्रपट साईन करणार आहे. सुश्मिताच्या म्हणण्यानुसार, '' गतवर्ष वर्षांपासून मी चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स वाचायला सुरुवात केली आहे. मला वाटते आहे की मी कोणत्याही चित्रपटाला 6 महिन्यांचा कालावधी देऊ शकते. याचा अर्थ हा नाही की मी तयार आहे आणि माझ्यासाठी चांगली स्क्रिप्टसुद्धा तयार आहे.'' सुश्मिताच्या बोलण्यावरुन एक गोष्ट नक्की समजते ती म्हणजे सुश्मिता बॉलिवू़डमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार आहे. मात्र चांगली स्क्रिप्ट मिळाल्याशिवाय ती होकार देणार नाही आहे.  ALSO READ :  ​ बुर्ज खलिफासमोर अशी बेधूंद नाचली सुश्मिता सेन! पाहा व्हिडिओ!!इंडस्ट्रीत नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा  रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला.