Join us

जामिनाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयातच रडून-रडून बेशुद्ध पडली सलमान खानची बहीण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 14:07 IST

सुपरस्टार सलमान खानसाठी सध्या खूपच वाइट काळ सुरू आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. गेल्या दोन दिवसांपासून तो ...

सुपरस्टार सलमान खानसाठी सध्या खूपच वाइट काळ सुरू आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. गेल्या दोन दिवसांपासून तो तुरुंगात बंद असून, जामिनासाठी सर्वोतपरी प्रयत्न करताना दिसत आहे. काही वेळातच सलमानच्या जामीन अर्जावर सेशन कोर्टाकडून निर्णय दिला जाईल. मात्र त्याअगोदरच सलमानच्या बहिणीविषयी एक बातमी समोर आली असून, त्याचा धक्का सलमानला बसण्याची शक्यता आहे. अलवीरा आणि अर्पिता या दोन्ही बहिणी सलमानच्या खूप क्लोज आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या दोघीही जोधपूरमध्ये तळ ठोकून आहेत. कालपासून या दोघीही जामिनाच्या अर्जावरील सुनावणीप्रसंगी बॉडीगार्ड शेरासोबत न्यायालयात उपस्थित राहत आहेत. दोघी बहिणींच्या कपाळावर भावाविषयीची चिंता स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, आज न्यायालयात पोहोचताच अलवीरा एवढी भावनिक झाली होती की, रडून रडून ती बेशुद्ध पडली. अलवीराला अशा स्थितीत बघून अर्पिताला तिला सांभाळणे अवघड झाले होते. तेव्हा शेराने अलवीराला आधार देत तिला न्यायालयाच्या बाहेर नेले. सूत्रानुसार, जामिनाच्या अर्जावर सुनावणी होण्याअगोदर अर्पिता आपल्या भावाच्या सुटकेसाठी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली होती. दरम्यान, जेव्हा सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली तेव्हा अर्पिता आणि अलवीरा दोघींचेही रडून रडून हाल झाले होते. दरम्यान, २० वर्षांपूर्वी घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल समोर आला असून, त्यामध्ये अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर याप्रकरणात असलेल्या अन्य चार संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सध्या सलमान ‘रेस-३’ची शूटिंग करीत आहे. त्याचबरोबर ‘भारत, किक-२’ या बिग बजेट चित्रपटांवरही काम करीत होता. त्याचबरोबर बिग बॉसच्या सीजन १२ आणि १० का दम या रिअ‍ॅलिटी शोचीही तो तयारी करीत होता.