Join us  

शेतकरी आंदोलनादरम्यान सलमान खानने शेअर केला शेतातील फोटो, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 2:15 PM

सलमान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे जो फोटो व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हायरल झालेल्या फोटोत सलमान खान कुदळीने शेतात काम करताना दिसतो आहे. हा फोटो शेअर करत सलमान खानने कॅप्शन दिले आहे. सलमान खान लॉकडाउन दरम्यान बरेच दिवस पनवेल येथील फार्म हाउसवर थांबला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत सलमान खानचा अंदाज पाहून चाहते इंप्रेस झाले आहेत. स्वतः सलमानने हा फोटो शेअर करत भारत माताचे स्मरण केले आहे. सोशल मीडियावर सलमान खानचा हा फोटो पाहून तो शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.  या व्हायरल फोटोतील सलमान खानचा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे आणि त्याची फिटनेसदेखील सर्वांना आवडते आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सलमान खान राधे चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होण्याच्या तयारीत आहे. सलमानने चित्रपटाचे शेवटच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. त्याचा चित्रपटातील शेवटचा लूकही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. 

दरम्यान, सलमान खानने गुपचुप आपल्या पुढचा सिनेमा 'अंतिम'च्या शूटिंगला सुरूवात केली आहे. सलमानचा मेहुणा आयुष शर्माने सलमानच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या सिनेमात सलमान एका शीख पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष शर्मा एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमानचा व्हिडिओ शेअर करताना आयुषने लिहिले की, ''अंतिम सुरुवात झाली.' व्हिडिओमध्ये सलमान काळ्या पगडी आणि खालसा लॉकेट घालून भाजी मार्केटमधून जाताना दिसतो आहे.

टॅग्स :सलमान खानआयुष शर्मा