Join us  

डेटिंगच्या चर्चेदरम्यान कार्तिक आणि जान्हवीचा फोटो होतोय व्हायरल, फॅन्स विचारताहेत- 'ये रिश्ता क्या कहलाता है...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 7:20 PM

कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. खरेतर जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यन गोव्यात न्यू  इअरला एकत्र टाइम स्पेंड करताना दिसले होते. त्यांचे गोव्यातील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. अशात चाहत्यांना समजत नाही आहे की हे दोघे दोस्ताना २ चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्यात आहेत कि हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच जान्हवी आणि कार्तिकचे आणखी फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. जे पाहून चाहते त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

फोटोत कार्तिकने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे तर जान्हवीने ब्लू डेनिम जिन्ससोबत ब्लॅक रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे. तसेच त्यांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दोघांनी चेहऱ्यावर मास्क लावला आहे. हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की हे दोघे एकमेकांचे फ्रेंड्सपेक्षा आणखी जास्त क्लोज वाटत आहेत.

यापूर्वी कार्तिक आणि जान्हवीचा एक फोटो समोर आला होता ज्यात दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. हा फोटो समोर आल्यानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चेला सुरूवात झाली होती. कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. त्यांच्या चाहत्यांना त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री खूप भावते आहे.

कार्तिक आणि जान्हवीला मनीष मल्होत्राच्या न्यू इअर पार्टीमध्ये एकत्र पाहिले होते. इतकेच नाही तर सोशल मीडियावर देखील त्यांच्यामध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. जान्हवीच्या आधी कार्तिक सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चेला जोर धरला होता. लव आज कलमध्ये या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला आणि सारा व कार्तिकच्या मैत्रीही दुरावा निर्माण झाला. आता कार्तिक जान्हवीसोबत दिसतो आहे आणि ही जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरकार्तिक आर्यन