Join us  

​सॅनिटरी नॅपकीनच्या वापराबद्दल दिया मिर्झाने केला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 10:28 AM

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिची अलीकडे संयुक्त राष्ट्र पर्यावरण सद्भावना दूत म्हणून निवड झाली. अर्थात संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सद्भावना ...

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिची अलीकडे संयुक्त राष्ट्र पर्यावरण सद्भावना दूत म्हणून निवड झाली. अर्थात संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सद्भावना दूत होण्याच्या आधीपासून  दिया   पर्यावरण आणि वाढत्या प्रदूषणावर बोलत आली आहे. सद्भावना दूत नियुक्त झाल्यावर  दिया अलीकडे पर्यावरण सुरक्षेवर बोलली. पर्यावरणात हानीकारक वस्तूंचा वापर मी पूर्णपणे बंद केला आहे,असे तिने यावेळी सांगितले. यातली एक प्रमुख गोष्ट म्हणजे, सॅनिटरी नॅपकीन. होय, मी सॅनिटरी नॅपकीनचा वापर बंद केला आहे, असे तिने सांगितले. यामागचे कारणही तिने स्पष्ट केले. सॅनिटरी नॅपकीन पर्यावरणास वेगाने प्रदूषित करत आहेत. स्त्रियांच्या आरोग्यसुविधांसाठी वापरली जाणारी सॅनिटरी नॅपकीन आणि लहान मुलांचे डाईपरमुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण होऊ पाहतो आहे. त्यामुळे पीरियड्सदरम्यान सॅनिटरी नॅपकीनचा वापर मी पूर्णपणे थांबवला आहे. खरे तर एक अभिनेत्री या नात्याने हे विधान करणे धाडसाचे आहे. कारण सध्या भारतातील महिलांना सॅनिटरी नॅपकीनच्या वापरासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मला याच्या जाहिरातीसाठी अनेकदा विचारणा झाली. पण मी नेहमीच अशा जाहिरातींना ठाम नकार देत आलीय. आता मी सॅनिटरी नॅपकीनऐवजी १०० टक्के नैसर्गिकरित्या नष्ट होणाºया बायोडिग्रेडबल नॅपकीनचा वापर करते. भारतात शतकांपासून पीरियड्सदरम्यान महिला कॉटन वापरत आहेत. पण आता नव्या तंत्राने पर्यावरणास हानीकारक नसलेले पर्यायही उपलब्ध आहेत, असे दिया यावेळी म्हणाली. शिवाय तिने सर्व महिलांना बायोडिग्रेडेबल नॅपकीन वापरण्याचे आवाहनही केले.ALSO READ : दोन वर्षांनंतर सेटवर गेल्यावर दिया मिर्झाची 'ही' होती प्रतिक्रियादियाने आपल्या करिअरची सुरुवात 2001 मध्ये आलेल्या ‘रहना है तेरे दिल में ’ चित्रपटातून केली होती. चांगली सुरुवात होऊन ही तिला हवं तसं यश मिळवता आले नाही. अभिनयाशिवाय दियाने पत्नी साहिल सिंघासह एक ‘बॉर्न फ्री एंटरटेनमेंट’ या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली. बॉबी जासूस हा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट होता.