Join us  

Salman Khan: पूजामुळे सलमान खान अजूनही आहे बॅचलर? विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 1:51 PM

Salman Khan : सलमान खान अद्यापही अविवाहित आहे. कारण काय तर पूजा..., आता ही पूजा कोण? तर तुम्हीच बघा...

Dream Girl 2:  अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचा नवा टीझर रिलीज झालाये. या टीझरची खास बात म्हणजे, 'किसी का भाई किसी की जान'सोबत त्याचं कनेक्शन आहे. होय, 'ड्रीम गर्ल 2'मध्ये पूजा फोनवर सलमानशी बोलताना दिसतेय. ही पूजा कोण तर आयुष्यमान खुराणा. होय, पूजाची भूमिका आयुष्यमान साकारतोय.

टीझरमध्ये 'किसी का भाई किसी का जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामधील अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आवाज ऐकू येतो. व्हिडीओमध्ये तो 'ड्रीम गर्ल 2' मधील पूजासोबत फोनवर गप्पा मारताना दिसतो. 'मैं बोल रहा हूं भाईजान. मैं भाई दूसरों के लिए हूं. अभी तक तुम्हारे लिए कुंवारा हूं. सुना है इस बार ईद पर पूजा होगी. चेहरा कब दिखा रही हो,' असं सलमान म्हणतो.  'मुझे हमेशा औरतों ने अंधेरे में रखा है इसीलिए वह कुंवारे हैं,'असा खुलासाही तो करतो.

'ड्रीम गर्ल- 2' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटामधील आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 'ड्रीम गर्ल- 2' मध्ये आयुष्मानसोबतच अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, ​​विजय राज, अन्नू कपूर, सीमा पाहवा, मनोज जोशी, अभिषेक बनर्जी आणि मनजोत सिंह असे सगळे स्टार्स आहेत. हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  

टॅग्स :सलमान खानआयुषमान खुराणाड्रिम गर्लबॉलिवूड